Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

Thackeray Family Tree : 19 वर्षांनंतर राज - उद्धव येणार एकाच मंचावर, पाहा प्रबोधनकार ठाकरेंची वंशावळ; ठाकरे नाही तर हे होतं त्यांचं खरं आडनाव

Balasaheb Thackeray Family Tree : गेल्या 19 वर्षांनंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन वाघ राज आणि उद्धव हे ठाकरे बंधू एकाच मंचावर एकत्र येत आहेत. अशातच महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं भक्कम स्थान निर्माण करणाऱ्या ठाकरे कुटुंबाची वंशवेलीवर एक नजर टाकूयात. 

Thackeray Family Tree : 19 वर्षांनंतर राज  - उद्धव येणार एकाच मंचावर, पाहा प्रबोधनकार ठाकरेंची वंशावळ; ठाकरे नाही तर हे होतं त्यांचं खरं आडनाव

Balasaheb Thackeray Family Tree : महाराष्ट्राच्या राजकारणात 5 जुलैला एक ऐतिहासिक घटना आहे. तब्बल 19 वर्षांनंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन वाघ राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका मंचावर एकत्र येत आहे. निमित्त आहे, मराठी भाषेसाठी हे ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी त्रिभाष म्हणजे शालेय अभ्यात हिंदी सक्तीचा एक जीआर काढला होता. त्या जीआरविरोधात मराठी माणसासह उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एल्गार पुकारला. मराठीच्या मुद्दावर सरकारविरोधात दोन्ही भाऊ एकत्र 5 जुलैला मोर्चा काढणार होते. पण त्यापूर्वी राज्य सरकारने तो जीआर रद्द केला. आता हे दोन भाऊ मराठी माणसाच्या विजय साजरा करण्यासाठी 5 जुलैला विजय मेळावा घेणार आहेत. मराठी माणसांमध्ये मुंबई असो महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं भक्कम स्थान निर्माण करणाऱ्या या ठाकरे कुटुंबांची वंशवेल पाहूयात.  

ठाकरे नाही तर हे होतं त्याचं खरं आडनाव

ठाकरे घराण्याला हे आडनाव मिळण्याचे संपूर्ण श्रेय जाते ते म्हणजे प्रबोधनकार ठाकरे यांना. प्रबोधनकार म्हणजे केशव ठाकरे यांनीच ठाकरे आडनाव पहिल्यांदा वापरायला सुरूवात केली. त्यामागेही एक विशेष कारण आहे. कोलकात्यात जन्म घेतलेले ब्रिटीश लेख विलियम मेकपिस थैकरी यांच्या लिखाणाची केशव म्हणजे प्रबोधकार ठाकरे यांच्यावर छाप होती. त्यांच्या उपहासात्मक लिखाणाचा प्रबोधनकारांवर प्रभाव होता. पुढे प्रबोधनकारांनीही विलियम थैकरी (Thackeray) यांच्या आडनावाचे स्पेलिंग वापरत ठाकरे हे नाव लावण्याची सुरूवात केली. आजही ठाकरे घराण्यातील सर्वच व्यक्ती ह्याच आडनावाची स्पेलिंग वापरतात.

प्रबोधनकारांनी ठाकरे यांचे आजोबा कृष्णाजी माधव ठाकरे हे मात्र पनवेलकर हे नाव वापरत होते. कारण ते पनवेल येथे येऊन राहिल्याने त्यांनी पनवेलकर असे नाव लावायला सुरूवात केली होती. प्रबोधनकार ठाकरे यांचे वडील सीताराम ठाकरे हेदेखील पनवेलकर हे नाव लावत होते. पण सीताराम पनवेलकर यांनी आपल्या मुलाला शाळेत प्रवेश मिळवून देताना ठाकरे हे आडनाव लावले. पण  Thakre या आडनावाची स्पेलिंग बदलत पुढे प्रबोधनकारांनी Thackeray हे आडनाव वापरायला सुरूवात केली.

fallbacks

पाहा प्रबोधनकार ठाकरेंची वंशावळ

प्रबोधनकार ठाकरे आणि रमाबाई ठाकरे यांना पाच मुली आणि तीन मुलं.

मुली - पमा टिपणीस, सरला गडकरी, सुशिला गुप्ते, संजीवनी करंदीकर आणि सुधा सुळे.

मुलं - बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे आणि रमेश ठाकरे.

1. प्रबोधनकार ठाकरे यांचे थोरले पुत्र बाळासाहेब ठाकरे :

बाळासाहेब ठाकरे यांचा विवाह सरला वैद्य यांच्याशी झाला. लग्नानंतर सरला यांचं नाव बदल्याने त्या मिनाताई ठाकरे झाल्या. बाळासाहेब-मिनाताई ठाकरे यांना तीन मुलं. थोरला बिंदुमाधव. दोन नंबरचा पुत्र जयदेव ठाकरे आणि सर्वात धाकटे उद्धव ठाकरे.

बिंदुमाधव ठाकरे 

बिंदुमाधव ठाकरे यांचा विवाह माधवी यांच्याशी झाला. बिंदुमाधव यांना बिंदा अशी टोपण नावानेही हाक मारली जायची. चित्रपट निर्माते म्हणून त्यांनी चांगली ओळख मिळविली होती. मात्र 1996 साली बिंदुमाधव यांचे अपघाती निधन झाले. बिंदुमाधव यांना दोन अपत्य आहेत. मुलगा निहार ठाकरे आणि मुलगी नेहा ठाकरे. निहार ठाकरे हे ख्यातनाम वकील असून त्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शविला आहे. सोबतच ते सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाचा खटलाही लढत आहेत. तर नेहा ठाकरे यांचा मनन ठक्कर यांच्याशी विवाह झाला आहे.

fallbacks

जयदेव ठाकरे 

जयदेव ठाकरे यांचे तीन विवाह झाले. पहिला विवाह जयश्री ठाकरे यांच्याशी झाला. या दोघांना जयदीप ठाकरे हा एक मुलगा. जयदेव ठाकरे यांचा दुसरा विवाह स्मिता यांच्याशी झाला. या दोघांना दोन मुलं. राहुल आणि ऐश्वर्य. तर त्यांचा तिसरा विवाह अनुराधा ठाकरे यांच्याशी झाला. या दोघांना अनुराधा ही एक मुलगी. यापैकी सध्या जयदेव आणि स्मिता ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शविला आहे. तर जयदीप ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शविला आहे.

उद्धव ठाकरे 

उद्धव ठाकरे यांचा 1989 मध्ये रश्मी ठाकरे यांच्याशी विवाह झाला. उद्धव-रश्मी ठाकरे दोन मुलं. यात पहिला आदित्य ठाकरे तर दुसरा तेजस ठाकरे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोघेही राजकारणात सक्रिय आहेत. दोघेही आमदार आहेत. उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपद संभाळले आहे, तर आदित्य ठाकरे यांनी मंत्रीपदाची जबाबदारी पार पाडली आहे. तेजस ठाकरे हे वन्यजीव अभ्यासक आहेत. खेकड्यांची नवीन प्रजाती शोधण्याचे श्रेय त्यांना जाते.

fallbacks

2. प्रबोधनकार ठाकरे यांचे दुसरे पुत्र श्रीकांत ठाकरे :

श्रीकांत ठाकरे यांचा विवाह बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मिनाताई ठाकरे यांची बहिण कुंदा यांच्यासोबत झाला. श्रीकांत-कुंदा ठाकरे यांना दोन अपत्य. मुलगा स्वरराज आणि मुलगी जयवंती. स्वरराज यांचं नाव पुढे बाळासाहेब ठाकरे यांनी राज ठाकरे असं बदललं.

राज ठाकरे 

राज ठाकरे यांचा विवाह शर्मिला वाघ यांच्याशी झाला. राज-शर्मिला ठाकरे यांना अमित हा एक मुलगा. राज आणि अमित ठाकरे हे दोघेही राजकारणात सक्रिय आहेत. राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेचे अध्यक्ष आहेत. तर अमित ठाकरे मनसेच्या वाढीसाठी कार्यरत आहेत. राज ठाकरे हे व्यंगचित्रकार देखील आहेत.

3. प्रबोधनकार ठाकरे यांचे तिसरे चिरंजीव रमेश ठाकरे :

रमेश ठाकरे हे अविवाहित होते. ते कधी राजकारणाच्या पटलावरही चर्चेत आले नाहीत. 1999 साली वयाच्या 60 व्या वर्षी त्यांचं निधन झालं.

Read More