Pune Hinjewadi IT Park : पुण्यात असेल्या भारतातील सर्वात मोठ्या हिंजवडी IT पार्कमध्ये Blackout झाला होता. या Blackout नंतर सरकारने अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे. हिंजवडी IT पार्कमधील सर्व समस्या मार्गी लागणार आहेत. हिंजवडी आयटी पार्कसंदर्भात सरकारने ॲक्शन प्लान बनवला आहे. हिंजवडी IT पार्कमध्ये अनेक बड्या नॅशमल इंटरनॅशनल IT कपंन्या आहेत. मात्र, येथील IT कंपन्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
हिंजवडी IT पार्कमधील समस्या सोडवण्यासाठी सरकाने ॲक्शन प्लान बनवला आहे. पायाभूत सुविधा डिसेंबर अखेरपर्यंत पुर्ण करणे, खड्ड्यांच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य देणे सोबतच, मेट्रोचे काम देखील त्वरीत पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. पाणी साचू नये यासाठी सल्लागार समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्याद्वारे हिंजवडीत पाणी साचणार नाही यासाठीचा अहवाल ही सल्लागार समिती देणार आहे. ग्रामपंचायत, एमआयडीसी आणि महापालिकेत समन्वय करण्यासाठी एका अधिकाऱ्यावर जबाबदारी दिली जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्यासह बैठकीला स्थानिक लोकप्रतिनिधींची देखील उपस्थिती होते.
महापारेषण कंपनीच्या 220 केव्ही इन्फोसिस ते 220 केव्ही पेगासस अतिउच्चदाब भूमिगत वीज वाहिनीत 6 जून दुपारी 2.10 च्या सुमारास बिघाड झाल्यामुळे महापारेषणकडून महावितरणच्या एमआयडीसी आणि आयटी पार्क भागातील 91 उच्चदाब आणि सुमारे 12 हजार लघुदाब वीजग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळित झाला होता. पर्यायी मार्गाने वीजपुरवठा पूर्ववत केला जातोय, पण कंपन्यांना लागणारी वीज पुरेशी होत नाही. महापारेषण कंपनीने नियोजित देखभाल, दुरुस्तीच्या कामासाठी रविवारी सकाळी 11 ते दुपारी 1 असा वीजपुरवठा बंद केला होता. तशी सूचना वृत्तपत्रांमध्येही प्रसिद्ध केली होती. मात्र देखभाल दुरुस्तीचे काम आटोपून वीजपुरवठा सुरु करताना दुपारी 2.10 वाजेच्या सुमारास 220 केव्ही इन्फोसिस ते 220 केव्ही पेगासस अतिउच्चदाब भूमिगत वीज वाहिनीत मोठा बिघाड झाला. परिणामी महावितरणच्या ग्राहकांना वीजपुरवठा करणाऱ्या 22 केव्हीच्या 25 वाहिन्या, अतिउच्चदाबचे इन्फोसिस व नेक्सट्रा हे दोन ग्राहक अशा 91 उच्चदाब आणि सुमारे 12 हजार लघुदाब ग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळित झाला. यामुळे हिंजवडीतील इंटनॅशनल कंपन्या ठप्प झाल्या होत्या.