Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

राजीनामा होणार की शनिदेव तारणार? मंत्रिपद जाण्याची चर्चा सुरु असताना कोकाटेंची शनी मंदिरात धाव

कोकाटेंबाबतचा निर्णय मंगळवारपर्यंत घेणार असल्याचं अजितदादांनी म्हटलं होतं. त्यानंतर लगेच कोकाटेंनी शनिदेवाकडे धावा केल्याचं बोललं जातंय.

राजीनामा होणार की शनिदेव तारणार? मंत्रिपद जाण्याची चर्चा सुरु असताना कोकाटेंची शनी मंदिरात धाव

नाशिक : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शनि मंदिरात जाऊन दर्शन घेतलंय. सर्वांच्याच मागे लागलेली साडेसाती संपू दे, असं साकडं माणिकरावांनी शनिदेवाकडे घातलं. कोकाटेंबाबतचा निर्णय मंगळवारपर्यंत घेणार असल्याचं अजितदादांनी म्हटलं होतं. त्यानंतर लगेच कोकाटेंनी शनिदेवाकडे धावा केल्याचं बोललं जातंय.

अजितदादांनी माणिकराव कोकाटेंबाबतचा निर्णय मंगळवारपर्यंत घेणार असल्याचं जाहीर करून टाकलं. त्यानंतर माणिकरावांनी थेट शनिदेवाचा धावा केलाय. कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी नंदुरबारच्या शनि मंदिरात जाऊन विधिवत पूजा केलीय. कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हीडिओ समोर आल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. माणिकरावांकडून कृषीखातं काढून घेतलं जाण्याचीही चर्चा आहे. स्वत: अजितदादांनीच तसे स्पष्ट संकेत दिले. त्यामुळं नंदूरबारच्या दौ-यावर असलेल्या माणिकरावांनी साडेसाती संपू दे यासाठी शनिदेवाकडे प्रार्थना केली.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हीडिओ समोर आणला होता. आता कोकाटे शनिदेवाच्या चरणी लीन झाले म्हटल्यावर शांत बसतील ते रोहित पवार कसले? पवारांनी आपल्या खास शैलीत टोला लगावला.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनीही शनि शिंगणापूर इथं जाऊन शनिदेवाकडे धावा केला होता. संजय शिरसाटही काही दिवसांपासून वादाच्या केंद्रस्थानी अडकलेत. त्यामुळे शनिदेवा चरणी लीन होऊन शिरसाट यांनीही प्रार्थना केली होती.

महायुतीच्या मंत्र्यांच्या मागे लागलेली संकटाची मालिका थांबण्याचं नाव घेत नाहीय. माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे अशा कठीण काळात मंत्री शनिदेवाकडे धावा करताना पाहायला मिळताहेत.

Read More