Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

अहमदनगरचा बाल पुढारी घनश्याम दरोडे दहावी उत्तीर्ण

 घनश्यामनं आपल्या अपयशाचं खापर फोडलंय ते सरकारवर...

अहमदनगरचा बाल पुढारी घनश्याम दरोडे दहावी उत्तीर्ण

अहमदनगर : अहमदनगरचा बाल पुढारी म्हणून फेमस असलेला घनश्याम दरोडे दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालाय... त्याला ५१ टक्के गुण मिळाले... श्रीगोंदा तालुक्यातील एका छोट्याशा गावात जन्मलेला आणि जन्मजात एका दुर्धर आजारानं ग्रस्त असलेला घनश्याम दरोडे सोशल मीडियामुळं प्रसिद्धीच्या झोतात आला... तालुक्यातील आमदार बबनराव पाचपुते यांच्यावर टीका करणारा त्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. त्याच्या जीवनावर आधारित एक सिनेमाही मध्यंतरी आला. आता दहावी उत्तीर्ण झाल्यानं घनश्याम पुन्हा एकदा चर्चेत आलाय...

अपयशाचं खापरं सरकारवर 

 अपेक्षेपेक्षा घनश्यामला कमी यश मिळालं असलं तरी त्याच्या घरचे त्याच्या कामगिरीवर खुश आहेत. मात्र घनश्यामनं आपल्या अपयशाचं खापर फोडलंय ते सरकारवर... गावात धड वीज आणि रस्ते नसल्यानं कमी गुण मिळाले, असा दावा पुढारी घनश्यामनं केलाय.

Read More