Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

दूध उत्पादक शेतकऱ्यांचा आजपासून एल्गार

दूध उत्पादक शेतकऱ्यांचा आजपासून एल्गार

अहमदनगर : दूध उत्पादक शेतकऱ्याच्या दूधाला किमान हमीभाव मिळावा यासाठी शेतकरी संघटना राज्यात मोफत दूध वाटणार आहे. प्रत्येक तहसील कार्यालयात हा दूध वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयापासून या मोफत दूध वाटपाला सुरुवात झालीय. दूध उत्पादक शेतकरी आंदोलनाचे निमंत्रक डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलंय. गुरुवारपासून राज्यातील सात जिल्ह्यामधील शेतकरी प्रत्येक तहसील कार्यालयात आणि कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाला दोन तास मोफत दूध वाटून सरकारच्या धोरणांचा निषेध करणार आहेत. दुधाला प्रतिलिटर २७ रुपये भाव मिळालाच पाहिजे अशी या संघटनेची मागणी आहे.

Read More