Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

काँग्रेसला आणखी एक धक्का, थोरात यांचे खंदे समर्थक भाजपात

संगमनेर बाजार समितीचे उपसभापती सतीश कानवडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

काँग्रेसला आणखी एक धक्का, थोरात यांचे खंदे समर्थक भाजपात

अहमदनगर : संगमनेर बाजार समितीचे उपसभापती सतीश कानवडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांच्या उपस्थित पक्षप्रवेश केला आहे. कनवडे हे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे खंदे समर्थक असल्यानं काँग्रेसला मोठा धक्का असल्याचं बोलले जात आहे. 

भाजपकडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला धक्के देण्यात येत आहे. कानवडे हे संगमनेर बाजार समीतीचे उपसभापती असून बाळासाहेब थोरात यांच्या बरोबर अनेक वर्षांपासून काँग्रेसमध्ये होते. आता थोरात विखे यांच्या राजकीय लढाईत विखेंनी थोरातांच्या गडाला दे धक्का दिला आहे. 

सतिष कानवडे यांची पुणतांबा येथुन सुरु झालेल्या शेतकरी संपात महत्वाची भुमिका राहीली होती. किसान क्रांती कोर कमेटीचे कानवडे हे सदस्य होते. सर्व सामान्य लोकांची कामे होत नसल्याने मी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे कानवडे यांनी सांगितले आहे.

Read More