Ahmednagar Crime News : महाराष्ट्राला हादरवाणी घटना अहिल्यानगरच्या केडगाव भागात घडली आहे. एका महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे. जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका जणांने महिलेवर अत्याचार केला असून त्यानंतर तीन जणांनी महिलेला मारहाण केली. मारहाणीत महिला गंभीर जखमी असून आरोपी हे पीडित महिलेचे नातेवाईक आहेत. याप्रकरणी पोलिसांनी डाळखुष काळे या आरोपीला ताब्यात घेतलं असून इतर तीन आरोपी फरार आहेत.
अहिल्यानगरच्या कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत केडगाव भागात एका महिलेवर सामूहिक अत्याचाराची घटना समोर आली आहे. जुन्या भांडणाच्या कारणावरून एका जणांने महिलेवर अत्याचार केला तर तीन जणांनी महिलेला मारहाण केली आहे. विशेष म्हणजे आरोपी हे पीडित महिलेचेच नातेवाईक आहेत. सोमवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली तर याबाबत आज सकाळी कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. मारहाणीत महिला गंभीर जखमी झाली असून पीडितेला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. डाळखुष काळे, अक्षय काळे, विनेश काळे, मोनेश टाटा चव्हाण या चार जणांवर कोतवाली पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी डाळखुष काळे या आरोपीला ताब्यात घेतले आहे, तर इतर तीन जण फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
दोन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अरुण उत्तप्पा असं या आरोपीचं नाव आहे. कल्याण पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपींना वडाळा रेल्वे पोलिसांकडे वर्ग केले आहे.