Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

अहमदनगरमध्ये शिवसेना नेत्याची हत्या

शिवसेना नेत्यावर घरात घुसून गोळीबार

अहमदनगरमध्ये शिवसेना नेत्याची हत्या

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील भोजडे गावात शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सुरेश शामराव गिरे यांची हत्या करण्यात आली आहे. सुरेश गिरे हे ४० वर्षांचे होते. गिरे राहात असलेल्या भोजडे येथील घरात घुसून गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली, त्यामुळे परिसराक खळबळ उडाली आहे. 

घटनास्थळी पोलीस उपअधिक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी भेट दिली आहे. मृतदेह कोपरगाव येथील ग्रामीण रग्णालयात पाठविण्यात आला आहे. गिरे यांची हत्या का झाली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

Read More