Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

आता पदर नाही, धोतर नाही डायरेक्ट टायरमध्ये टाकूनच... पुण्यातल्या कोयता गँगला अजित पवार यांची थेट धमकी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोयता गँगला थेट धमकी दिली आहे.  दहशत माजवणार्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. 

आता पदर नाही, धोतर नाही डायरेक्ट टायरमध्ये टाकूनच... पुण्यातल्या कोयता गँगला अजित पवार यांची थेट धमकी

Pune Koyta Gang : मागील काही दिवसांपासून कोयता गँगने पुण्यात धुमाकूळ घातला आहे. कोयता गँने पुण्यात मोठी दहशत पसरवली आहे. पोलिस वारंवार कारवाई करत असाताना देखील कोयता गँंगचे कारनामे सुरुच आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोयता गँगला थेट धमकी दिली आहे. कोयता गॅंगवर कठोर कारवाईचा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.  

पुण्यातल्या कोयता गँगचा सुपडा साफ करणार असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला आहे. आता पदर नाही, धोतर नाही डायरेक्ट टायरमध्ये टाकूनच करवाई करणार असा सज्जड दमच अजित पवार यांनी भरला आहे. प्रत्येक आई-बापानं आपल्या मुलांना नीट वागायला शिकवलं पाहिजे असा सल्लाही त्यांनी दिला.  हुडकून काढून कारवाई करणार असा दमच अजित पवारांनी पुण्यातील कार्यक्रमात जाहीरपणे कोयता गॅंगला दम दिला आहे. 

कोयता गँगवर कडक कारवाई करण्यासाठी अमोल कोल्हे यांचे गृहमंत्र्यांना पत्र

पुण्याच्या हडपसरमध्ये कोयता गँग पुन्हा सक्रीय झालीय. मांजरी हडपसर परिसरात शनिवारी रात्री दोनच्या सुमारास ही गँग कोयते घेऊन फिरत होते. या कोयता गँगविरोधात थेट खासदार अमोल कोल्हेच रस्त्यावर उतरले होते. अमोल कोल्हे यांनी कोयता गँगवर कडक कारवाई करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिले होते. गुंडगिरी संपवून अवैध धंद्यांवर तात्काळ कारवाई करा, गुन्हेगारांना पाठीशी घालणा-या पोलीस अधिका-यांवरही कारवाई करा अशी मागणी अमोल कोल्हेंनी या पत्रातून केली होती.

पुणे शहरांमध्ये दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत आहेत. पुण्यात कोयता गँगची कमालीची दहशत पसरली आहे. लोहगाव परिसरात सराफा व्यापा-याला गळ्याला कोयता लावून लुटलंय. सराफा दुकानात आलेल्या दोघांनी वृद्ध व्यापा-याला मारहाण करत गळ्याला कोयता लावला आणि 73 हजार रूपयांचे दागिने चोरले. आझाद चौकात महाले ज्वेलर्समध्ये हा प्रकार घडलाय. शहरात एकीकडे धारदार तलवारी घेऊन गुंडगिरी सुरू आहे, तर दुसरीकडे कोयता गँग तुफान धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे पुण्यात कायद्याचं राज्य आहे का? गृहमंत्री वळसे पाटलांच्या आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या जिल्ह्यात पोलिसांचा वचक संपला का असे प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

Read More