Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

भाजपचा विरोध डावलून अजित पवारांनी नवाब मलिकांना दिलं मानाचं स्थान; महायुतीत पुन्हा वाद पेटणार?

Maharashtra politics : नवाब मलिकांवरून महायुतीत पुन्हा एकदा वादाची ठिणगी पेटण्याची शक्यता आहे. भाजपचा विरोध असतानाही नवाब मलिकांना राष्ट्रवादी अजित पवार गटानं मानाचं स्थान दिलंय.. त्यामुळं भाजपची कशी कोंडी झालीय, 

भाजपचा विरोध डावलून अजित पवारांनी नवाब मलिकांना दिलं मानाचं स्थान; महायुतीत पुन्हा वाद पेटणार?

Ajit Pawar:  नवाब मलिक आणि उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी एकाच मंचावर दिसले... निमित्त होतं अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेचं आणि माझी लाडकी बहीण योजनेचं... नवाब मलिकांचा मतदारसंघ असलेल्या अणुशक्तिनगरमध्ये अजित पवारांचं जंगी गुलाबी स्वागत करण्यात आलं.. 

खरं तर नवाब मलिकांना महायुतीत घेण्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कडाडून विरोध केला... देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झालेल्या मलिकांना महायुतीत घेऊ नये, असं पत्रच फडणवीसांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना लिहिलं होतं... त्यामुळं जेलमधून बाहेर आल्यानंतर मलिक राजकीयदृष्ट्या काहीसे एकाकी पडले होते... मात्र भाजपचा हा विरोध डावलून अजितदादांनी मलिकांना आपल्यासोबत मानाचं स्थान दिलं.. एवढंच नाही तर त्यांची कन्या सना मलिक यांच्यावर चक्क प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.

भाजपची कोंडी

राष्ट्रवादी अजित पवार गटानं नवाब मलिकांना पक्षात सामावून घेतल्यानं भाजपची चांगलीच कोंडी झालीय.. मलिकांबाबत आता भाजपची नेमकी भूमिका काय? देवेंद्र फडणवीसांच्या देशभक्तीचं काय होणार? असा चिमटा विरोधकांकडून काढला जातोय..

मलिक प्रकरणामुळं वाद पेटणार का?

महाविकास आघाडी सरकारमध्ये नवाब मलिक मंत्री असताना भाजपनं त्यांच्या विरोधात आंदोलनं केली.. मलिक विरुद्ध फडणवीस असा थेट वाद त्यावेळी गाजला.. जेलमधून बाहेर आल्यानंतर मलिकांची राजकीय कोंडी झाली... मात्र आता आगामी विधानसभा निवडणुकीत मुस्लीम मतदारांची नाराजी दूर करण्यासाठी अजित पवारांनी मलिकांना सोबत घेण्याची खेळी केल्याचं दिसतंय... आधीच महायुतीत कुरबुरी सुरू असताना, मलिक प्रकरणामुळं वाद पेटणार का, याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Read More