Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

स्थानिक पातळीवर शिवसेनेबरोबर जमवून घ्या, अजितदादांचे कार्यकर्त्यांना निर्देश

अजित पवारांचे  बैठकीत कार्यकर्त्यांना सूचना

स्थानिक पातळीवर शिवसेनेबरोबर जमवून घ्या, अजितदादांचे कार्यकर्त्यांना निर्देश

मुंबई : स्थानिक पातळीवर शिवसेनेसोबत जमवून घ्या असे निर्देशच अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिले आहे. 'आपल्याला शिवसेनेबरोबर कायम राहायचे आहे. असा सूचना त्यांनी राष्ट्रवादीच्या बैठकीत कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. महाविकासआघाडी झाल्यानंतर स्थनिक पातळीवर खटके उडत आहे. पण आपल्याला सेनेबरोबर जुळवून घ्यायचे आहे. लवकरच महामंडळ वाटप करु.' असंही अजितदादांनी म्हटलं आहे.

दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी देखील महाविकासआघाडी म्हणून एकत्र लढण्याचे संकेत दिले आहेत. भविष्यात कार्यकर्त्यांसोबत चर्चा करुन एकत्र कार्यक्रम राबवू असं देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

आगामी महापालिका निवडणुकींमध्ये देखील महाविकासआघाडी एकत्र लढण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जुळत नसल्याच्या बातम्या देखील पुढे आल्या होता. काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी उपमुख्यंमत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. यावर शिवसेनेने नाराजी व्यक्त केली होती.

Read More