Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

राम मंदिरावरुन अजित पवारांची भाजपवर टीका

अजित पवारांची भाजपवर टीका

राम मंदिरावरुन अजित पवारांची भाजपवर टीका

धुळे : निवडणुकांच्या तोंडावर राम मंदिराची आठवण करणारे सत्ताधारी चार वर्ष काय झोपा काढत होते का ? असा थेट प्रश्न सत्ताधार्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी विचारत भाजपवर निशाणा साधला. धुळे शहरात काँग्रेस पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्या इर्शात जहागीरदार यांच्या प्रवेश सोहळ्यात पवार बोलत होते. 

गुंडगिरीच्या बळावर भाजप सत्ता कबीज करीत असल्याचा आरोप देखील अजितदादांनी यावेळी केला. वाढती महागाई आणि बेरोजगारीवरही त्यांनी बोट ठेवले. मुस्लिमांना आघाडी सरकारने आरक्षण दिले मात्र ते आरक्षण या सरकारे सोयीस्कररीत्या बाजूला ठेवलायचा आरोप पवारांनी केला. ५९ मिनिटात कर्ज देण्याची योजनाही जुमला असल्याचा आरोप पवारांनी करत भाजपवर चौफेर टीका केली. 

Read More