Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

आपण काही साधू संत नाही... 4 शब्दात अजित पवार यांनी केला भाजपसोबत युती का केली याचा जाहीर खुलासा

भाजपसोबत युती का केली असा प्रश्न अजित पवार यांना विचारला जातो. अजित पवार यांनी दाहीर कार्यक्रमात याचा खुलास केला आहे. 

आपण काही साधू संत नाही... 4 शब्दात अजित पवार यांनी केला भाजपसोबत युती का केली याचा जाहीर खुलासा

Ajit Pawar NCP foundation Day 2025 : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज वर्धापन दिन पुण्यात साजरा होत आहे. या सोहळ्यानिमित्ताने अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मोठा खुलासा केला आहे. आजही काहीजन विचारतात तुम्ही भाजपसोबत का गेलात ?  आपण काही साधू संत नाही असं म्हणत अजित पवार यांनी एका वाक्यात भाजपसोबत युती का केली याचा जाहीर खुलासा केला आहे. 

10 जून 1999 रोजी हा राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाला. स्वाभिमानातून राष्ट्रवादीची स्थापना झाली.  तेव्हापासून राज्यात आघाडी युतीचे सरकारं येत आहे. कुणालाही एकहाती सत्ता मिळालेली नाही.  2019 ला शिवसेनेसोबत सरकार केले त्यावेळेस तडजोड केली. मात्र, त्यानंतर मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. विरोधी पक्षात बसून आंदोलन करुन काही होत नाही. आपण साधू संत नाही. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जनहितासाठी आपण बेरजेचं राजकारण करणारे लोक आहेत.  

देशाचा विकास झाला पाहिजे. राज्याचा सर्वांगिण विकास झाला पाहिजे  यामुळे NDA सोबत भाजप सोबत जाण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचा खुलासा अजित पवार यांनी केला आहे. माझ्यावर खोटे आरोप होतात की मी समाज कल्याण विभागाचा निधी कमी केला. झिरवळ इथं हेच त्यांनी सांगावं कुठे कमी केला. उगीच माझ्यावर काहीही आरोप केले जातात.  आजच्या कँबिनेटमध्ये राज्य मागासवर्ग आयोगाप्रमाणेच अनसुचित जाती आयोगाला वैधानिक दर्जा मिळाला आहे.  वर्धापन दिनाचा शुभेच्छा मिञांनो आपला पक्ष समाजहिताचा विचार करतो.  सत्ता येईल अन् जाईल विचार जपत राहिले पाहिजे अशा प्रकारचे मार्गदर्शन अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केले.   

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा वर्धापन दिन सोहळा बालेवाडी येथे होणारे तर शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचा वर्धापन सोहळा बालगंधर्व रंगमंदिर इथे होच आहे. राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनानिमित्ताने दोन्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पुण्यात दाखल झाले आहेत. 

 

Read More