Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार, अजित पवाराचं वक्तव्य, निवडणुकीत मोठा ट्विस्ट

माळेगाव कारखान्याचं भलं करण्याची धमक फक्त अजित पवार मध्येच. अजित पवारांची मोठी घोषणा. माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट.

माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार, अजित पवाराचं वक्तव्य, निवडणुकीत मोठा ट्विस्ट

Ajit Pawar On Malegaon Sugar Factory Election : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या रणधुमाळीत आता रंग चढला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः मीच या कारखान्याचा चेअरमन असल्याची घोषणा त्यांनी भर सभेत केली. माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे भलं करायचा असेल तर अजित पवारच करू शकतो कारखानदारी अडचणीत आहे. आपल्या वाढ वडिलांनी उभे केलेले कारखानदारी कोणाच्या हातात द्यायची तर अजित पवारच्या हातात द्यायची. असे म्हणत पवारांच्या पॅनलमधून चेअरमन कोण होणार अशी चर्चा होते. नाव जाहीर करण्याचं बोललं जात होतं. आज अजित पवारांनी भर सभेत चेअरमन मीच होणार असं घोषित केलं आहे. त्यामुळे आता माळेगाव सहकारी साखर  कारखान्याची संचालक पदाची निवडणूक यंदा चौरंगी होणार आहे.

माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत 21 जागांसाठी ही लढत होणार आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उमेदवारी ही कायम राहिली आहे. अजित पवार यांनी आपल्या सत्ताधारी नीळकंठेश्वर पॅनेलमध्ये सात विद्यमान संचालक, पाच माजी संचालकांनाही पुन्हा संधी दिली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाने बळीराजा सहकार बचाव पॅनेलचे अधिकृत उमेदवार जाहीर केले आहेत. 

नीळकंठेश्वर पॅनेलमध्ये कोणाला उमेदवारी 

माळेगाव साखर कारखाना निवडणुकीसाठी नीळकंठेश्वर पॅनेलमधून अनेकांना उमेदवारी देण्यात आली आहे. ज्यामध्ये पणदरे गटामधून तानाजी तात्यासाहेब कोकरे, स्वप्नील शिवाजीराव जगताप, योगेश धनसिंग जगताप. माळेगाव गटामधून शिवराज प्रतापसिंह जाधवराव, बाळासाहेब पाटील तावरे. सांगवी गटामधून विजय श्रीरंगराव तावरे, विरेंद्र अरविंद तावरे आणि गणपत चंद्रराव खलाटे. खंडाज-शिरवली गटामधून प्रताप जयसिंग आटोळे, सतिश जयसिंग फाळके. बारामती गटामधून नितीन सदाशिव सातव, देविदास सोमनाथ गावडे. 

निरावागज गटातून जयपाल निवृत्ती देवकाते, अविनाथ गुलाबराव देवकाते. बारामती गट ब वर्ग संस्था मतदार संघातून अजित अनंतराव पवार. अनुसूचित जाती जमातीमधून रतनकुमार साहेबराव भोसले. महिला राखीव प्रतिनिधीमधून संगिता बाळासाहेब कोकरे आणि सौ. ज्योती मच्छिंद्रनाथ मुलमुले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. इतरमध्ये विलास हृषिकांत देवकाते आणि नितीन वामनराव शेंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

Read More