जयेश जगड, झी 24 तास, अकोला: अकोल्यातून संतापजनक घटना समोर आली आहे. येथे एका अल्पवयीन मुलीचे शोषण करण्यात आलंय. अकोला शहरातील खदान पोलीस ठाण्यात हद्दीत हा प्रकार घडलाय. एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे अश्लील व्हिडिओ- फोटो व्हायरल करण्याची धमकी देण्याचा प्रकार घडलाय. यानंतर पीडित मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली. याप्रकरणी खदान पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपींकडून पीडितेला मारहाण करत शोषण केल्याची घटना समोर आली आहे. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. तर आरोपीकडून पिडीतेचे अश्लील फोटोही व्हायरल करण्यात आले आहेत. एका सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीने पीडितेच्या आईकडून अकोल्यातील खदान पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील आरोपी हे अल्पवयीन असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. मात्र यामध्ये अधिक चौकशी करण्यात येत आहे. आरोपींनी पीडित मुलीचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढून इंस्टाग्रामवर व्हायरल केले आहेत. दरम्यान या प्रकरणी आणखी पीडित आणि आरोपी वाढण्याची शक्यता देखील आहे त्यामुळे पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला आहे.
कोल्हापुरात अल्पवयीन मुलाने आपल्या मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र यापेक्षा धक्कादायक यामागील कारण आहे. मदरसा बंद होऊ सुट्टी मिळावी यासाठी मुलाने आपल्यात मित्राला ठार केलं. तरुणाने तोंडात गोळा कोंबून विजेचा शॉक देऊन मित्राची हत्या केली आहे. हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच पोलिसांनी याप्रकरणी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात आळते इथं असलेल्या मदरशात शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याने मदरसा बंद पडून आपल्याला सुट्टी मिळावी यासाठी मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेवून संबंधित अल्पवयीन विद्यार्थ्याने 11 वर्षीय फैजान नजिम याच्या तोंडात गोळा कोंबला, त्यानंतर विजेचा शॉक देऊन खून केला. ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. खून झालेला 11 वर्षीय फैजान नजिम हा बिहार राज्यातला आहे. कोल्हापूर पोलिसांनी तपास करून अल्पवयीन मित्राला ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्याची हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.