Akola Crime News : सोशल मिडियामुळे एका विवाहितेचं आयुष्य केलं उद्ध्वस्त झाले आहे. इंस्टाग्रामवर ओळख झालेल्या महिलेने नवसाचा बहाणा करुन पीडित विवाहितेला अज्ञात ठिकाणी नेले. या विवाहित महिलेवर सलग 5 दिवस लैंगिक अत्यार केला. या प्रकरणी नवरा-बायकोसह तिघांना अटक करण्यात आली आहे.
गुंगीचे औषध देऊन विवाहितेचे लैंगिक शोषण केल्याची घटना अकोल्यातील बार्शीटाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आलीय..या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अकोल्यातील बार्शीटाकळी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील फिर्यादी विवाहित महिलेची ओळख दोन महिन्यांपूर्वी इंस्टाग्रामवर आरोपी महिला ज्योती हिवराळे हिच्यासोबत झाली होती. फिर्यादी महिलेला मूलबाळ होत नसल्याने, नवस करण्याच्या निमित्ताने ज्योतीने तिला मंदिरात घेऊन जाण्याचे आमिष दाखवले.
ज्योती हिवराळे, तिचा पती नागेश हिवराळे आणि सुपेश पाचपोर यांनी संगनमत करून 5 ते 9 मे 2025 दरम्यान फिर्यादी महिलेला गुंगीचे औषध देऊन लैंगिक शोषण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
महिलेच्या फिर्यादीवरून बार्शीटाकळी पोलिस ठाण्यात संबंधितांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींचा बुलढाणा जिल्ह्यातून शोध घेत अटक केली आहे. सध्या तिघेही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून, पुढील तपास सुरू आहे.
पुण्यातील चाकण MIDC कंपनीत कामावर निघालेल्या महिलेला ओढून नेत बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. 13 मे च्या रात्री 11 च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी नराधम प्रकाश भांगरेला चोवीस तासांत बेड्या ठोकण्यात आल्यात. 27 वर्षीय महिला रात्रपाळीच्या कामासाठी निघाली होती. एका कंपनीत ही पीडित हेल्पर म्हणून काम करायची. मेदनकरवाडी येथील या कंपनीच्या अगदी जवळ ती पोहचली. त्याचवेळी नराधमाने तिला जबरदस्तीने शाळेच्या मागील बाजूस ओढून नेले. तेथे तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार करून, मारहाण केली आणि कोणाला काही सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
महिलेने प्रतिकार ही केला, आरोपीला चावा ही घेतला. त्यानंतर आरोपी तिथून पसार झाला. मग तिथूनच निघालेल्या महिला कामगार आणि पुरुषाच्या मदतीने पीडिताने चाकण पोलिसांना याबाबत कळवलं. महिलेवर सध्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू असून नराधम प्रकाश भांगरेला बेड्या ठोकण्यात आल्यात. सीसीटीव्हीच्या आधारे त्याचा शोध घेण्यात चाकण पोलिसांना यश आलंय. तो सध्या मेदनकरवाडीमध्ये राहायला आहे, मात्र तो मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील अकोले गावचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याने याआधी असे काही कृत्य केलंय का? याचा तपास ही केला जात आहे.