Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

आलिबागमध्ये तणाव! 2 ST बसमध्ये चिरडून तरुणाच्या मृत्यूनंतर तुफान राडा; बस फोडल्या

Alibaug ST Bus Accident: या अपघातानंतर घटनास्थळी तुफान राडा झाल्याचं पाहायला मिळालं असून एसटी बसची तोडफोड करण्यात आली आहे.

आलिबागमध्ये तणाव! 2 ST बसमध्ये चिरडून तरुणाच्या मृत्यूनंतर तुफान राडा; बस फोडल्या

Alibaug ST Bus Accident: पुण्यामधील राज्य परिवहन महामंडळाच्या स्वारगेट डेपोमधील 'शिवशाही' बसमध्ये तरुणीवर बलात्काराच्या घटनेनं महाराष्ट्र हादरुन गेला आहे. या प्रकरणातील फरार आरोपीचा शोध सुरु असून दुसरीकडे परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या नेतृत्वाखाली आज आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यातील परिवहन महामंडळाच्या डेपोंच्या सुरेक्षेचा मुद्दा या बैठकीत चर्चीला जाणार आहे. एकीकडे ही बैठक सुरु असतानाच दुसरीकडे अलिबागमधून राज्य परिवहन महामंडळाच्या दोन एसटी बसचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या अपघातानंतर मृत या ठिकाणी तोडफोड केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

घटनास्थळी जोरदार राडा

मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग बस स्थानकासमोर दोन बसेसमध्ये चिरडून एका मोटार सायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या दुर्देवी दुर्घटनेमध्ये मरण पावलेल्या तरुणाचं नाव जयदीप बना असं आहे. अपघातानंतर मृत तरुणाच्या संतप्त नातेवाईकांनी घटनास्थळी जोरदार राडा केला आहे. मृत तरुणाच्या नातेवाईकांनी अपघातग्रस्त एसटी बसेसच्या काचा फोडून वाहतूक रोखून धरली. यामुळे या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे.

अतिरिक्त कुमक मागवण्यात आली

या दोन्ही एसटी बसची धडक इतकी जोरदार होती की सदर अपघातात एका रिक्षेचेही नुकसान झालं आहे. दोन्ही बसेस अलिबाग बस स्थानकात शिरत असताना हा अपघात झाला. या दोन बसच्यामध्ये तरुण मोटार सायकलसह चिरडला गेला. जमावाला पांगवताना पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे. या ठिकाणी पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे.

नक्की वाचा >> 'स्वारगेट'चा नेमका अर्थ काय? हे नाव आलं तरी कुठून? 10 पैकी 9 जणांना याची कल्पनाच नाही

पुण्यातील घटनेच्या दोन दिवसांपूर्वी एसटी डेपोतून पाठवण्यात आलेली दोन पत्रं चर्चेत

स्वारगेट एसटी डेपोमध्ये खासगी एजंट्स, तृतीयपंथी तसेच ऑटो रिक्षांचा त्रास वाढला असून पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करावी याबाबतचे पत्र आगार व्यवस्थापकांनी पोलिसांना दिलं होतं. तरुणीवर अत्याचाराची घटना घडली त्याआधी 3 दिवस म्हणजे 22 तारखेलाच 2 वेगवेगळी पत्र स्वारगेट पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांना पाठवण्यात आली आहेत. तरी देखील पोलिसांकडून काहीच कारवाई झाली नाही. अशाच प्रकारची पत्र याआधी देखील अनेकदा देण्यात आलेली आहेत. मात्र कारवाई होत नसल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा स्वारगेट स्थानकात मुक्तपणे वावर सुरू राहतो. त्याचाच परिणाम म्हणून परवाची घटना म्हणता येईल. स्वारगेट बस स्थानकातील सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हा मुद्दा महत्त्वाचा आहे.

स्वारगेट डेपोसमोर आंदोलनं

पुण्यातील स्वारगेट येथील प्रकार बुधवारी समोर आल्यानंतर स्वारगेट एसटी स्टँड परिसरामध्ये आंदोलनं सुरु आहेत. पुण्यामध्ये महिला सुरक्षित नसल्याची प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ता तृप्ती देसाई यांनी दिली आहे. तरुणीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

Read More