Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

शिंदेंच्या शिवसेनेवर आतापर्यंतचा सर्वात मोठा आरोप; यादी वाचून नेत्यांनाच बसला धक्का

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थ्यांना निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षांमध्ये मोठ्याप्रमाणावर इनकमिंग सुरू आहे. विधानसभा निकालानंतर शिंदेंच्या शिवसेनेतही प्रवेश करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.  

शिंदेंच्या शिवसेनेवर आतापर्यंतचा सर्वात मोठा आरोप; यादी वाचून नेत्यांनाच बसला धक्का

आर्थिक घोटाळा, जमीन घोटाळा, नोकरभरती घोटाळा असे एक ना अनेक घोटाळे आपण पाहिलेत ऐकले आहेत. मात्र अहिल्यानगर जिल्ह्यात एका वेगळ्याच घोटाळ्याचा आरोप झाला आहे. आणि हा घोटाळा आहे चक्क पक्षप्रवेशाचा आहे. शिंदेच्या शिवसेनेचे अकोले तालुक्यातील नेते मंगेश मेंगाळ यांच्यावर हा आरोप करण्यात आला आहे. पाहुयात नेमका हा पक्षप्रवेश घोटाळा आहे तरी काय?

 

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थ्यांना निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षांमध्ये मोठ्याप्रमाणावर इनकमिंग सुरू आहे. विधानसभा निकालानंतर शिंदेंच्या शिवसेनेतही प्रवेश करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यातच अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यात पक्षप्रवेश घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या मारूती मेंगाळ यांच्यावर हा आरोप करण्यात आला आहे. तीन महिन्यांपूर्वी अकोलेतील ठाकर समाजाचे नेते मारुती मेंगाळे यांनी मोठं शक्तीप्रदर्शन करत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. यावेळी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलेल्या नेत्यांची जी यादी वाचली त्या यादीतील अनेकांनी आपण प्रवेश केलाच नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे मारुती इंगळेंवर पक्षप्रवेश घोटाळ्याचा आरोप करण्यात येत आहे. 


मारुती इंगळे यांनी याच पक्षप्रवेश सोहळ्यात अनेक ग्रामपंचायचे सरपंच, सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते असल्याचा दावा केला होता. मात्र यातील अनेकांनी आपण शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला नसतानाच आपलं नाव हा कार्यक्रमात घेणात आल्यानं या घटनेचा निषेध व्यक्त केलाय..


पक्ष प्रवेशात घोटाळा?

- अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यात पक्षप्रवेश घोटाळ्याचा आरोप
- मारुती मेंगाळ यांचा तीन महिन्यांपूर्वी शिदेंच्या शिवसेनेत प्रवेश 
- यावेळी मेंगाळ यांनी अनेक नेते, पदाधिकाऱ्यांची पक्षप्रवेशाची यादी वाचली
- पक्षप्रवेश न करता आपल्या नावांचा समावेश, अनेक पदाधिकाऱ्यांचा आरोप


तर अकोलेमध्ये झालेल्या या पक्ष प्रवेश घोटाळ्याला शिंदेंच्या शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनीही दुजोरा दिला आहे. तर मेंगाळा यांनी पक्षप्रवेशाच्या जाहिर केलेल्या यादीतील 40 ते 50 पदाधिकाऱ्यांची नावं प्रवेश न करताच टाकण्यात आल्यांचं शिवसेना संपर्क प्रमुख बाजीराव दाराडे यांनी म्हटलं आहे.


9 ऑगस्टला आदिवासी दिनानिमित्त मंगेश मेंगाळे यांनी अकोलेत मेळाव्याचं आयोजन केलं आहे. त्या मेळाव्याला एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत.. मात्र या मेळाव्याच्या तोंडावरच मंगेश मेंगाळ यांच्यावर पक्षप्रवेश घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे. 

FAQ

१. अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील पक्षप्रवेश घोटाळा म्हणजे काय?
अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या मारुती मेंगाळ यांच्यावर पक्षप्रवेश घोटाळ्याचा आरोप आहे. त्यांनी जाहीर केलेल्या पक्षप्रवेश यादीत अनेक बनावट नावांचा समावेश असल्याचा आणि काही व्यक्तींनी पक्षप्रवेश न केल्याचा दावा केला आहे.

२. कोणावर पक्षप्रवेश घोटाळ्याचा आरोप आहे?
शिंदे गटाच्या शिवसेनेचे अकोले तालुक्यातील आदिवासी ठाकर समाजाचे नेते मारुती मेंगाळ यांच्यावर हा आरोप आहे. त्यांनी तीन महिन्यांपूर्वी ठाण्यात शक्तीप्रदर्शनासह पक्षप्रवेश केला होता.

३. मारुती मेंगाळ यांनी कोणता दावा केला होता?
मारुती मेंगाळ यांनी पक्षप्रवेश सोहळ्यात अनेक ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केल्याचा दावा केला होता.

४. पक्षप्रवेश यादीत काय गैरप्रकार झाला?
पक्षप्रवेश यादीत समाविष्ट अनेक व्यक्तींनी सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसिद्ध करत, त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला नसल्याचं स्पष्ट केलं. त्यांच्या नावांचा गैरवापर झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Read More