Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

Beed: बीडमध्ये वाल्मिक कराडपेक्षा मोठा गुंड? कोण आहे हा गुंड?

बीडमध्ये नेमकं चाललंय काय असा प्रश्न आता पडू लागला आहे. धनंजय देशमुखांचे साडू दादासाहेब खिंडकर यांनी ओमकार सातपुते यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला. तर ओमकार सातपुते यानंही एकाला जबर मारहाण केल्याचं समोर आलंय.

Beed:  बीडमध्ये वाल्मिक कराडपेक्षा मोठा गुंड? कोण आहे हा गुंड?

Beed Crime News Santosh Deshmukh Murder Case :  बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली.  संतोष देशमुख हत्येनंतर बीड जिल्ह्यातील भयान वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे.  संपूर्ण देशासमोर आलं. दरम्यानं या संपूर्ण प्रकरणाची धग कायम असतानाच जिल्ह्यातील मारहाणीचे व्हिडिओ आता चांगलेच व्हायरल होत आहेत. धनंजय देशमुखांचे साडू दादासाहेब खिंडकर यांनी ओमकार सातपुते यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ओमकार सातपुते यानंही एकाला जबर मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.  यानंतर  दादासाहेब खिंडकर वाल्मिक कराडपेक्षा मोठा गुंड असल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

दोन दिवसांपूर्वी संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांचा साडू दादासाहेब खिंडकर याचा मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला होता. या व्हिडीओत दादासाहेब खिंडकर ओमकार सातपुते नावाच्या एका तरुणाला मारहाण करत आहे. दरम्यान या प्रकरणी दादासाहेब खिंडकर पोलिसांना शरण आला आहे. तर दुसरीकडे ज्या ओमकार सातपुतेला मारहाण करण्यात आली होती. तोच ओमकार सातपुतेचा एकाला  मारहाण करतानाचा व्हिडीओ आता समोर आला आहे. 

संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन लक्ष भरकटावं या हेतूनं बीडमधील मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल केले जात असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. तर दादासाहेब खिंडकर हा वाल्मिक कराडपेक्षा मोठा गुंड असल्याचा आरोप ओमकार सातपुतेचे चुलत बंधू परमेश्वर सातपुते यांनी केला आहे.

दरम्यान मारहाणीचा हा पहिलाच व्हिडिओ नव्हे आज देखील जमिनाच्या वादातून एका कुटुंबाला मारहाण करण्यात आल्याचं समोर आलं आहे. बीडच्या कुमशी गावात जमावाकडून भिसे कुटुंबाला मारहाण करण्यात आली या मारहाणीत अनिल भिसे हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

काही दिवसांपूर्वी सतीश भोसले उर्फ खोक्याचा एका व्यक्तीला बॅटनं मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी खोक्याच्या प्रयागराजमधून मुसक्या आवळल्या आहेत. मागील काही दिवसांपासून बीडमधील मारहाणीचे व्हिडिओ चांगलेच व्हायरल होत आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था शिल्लक आहे की नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Read More