Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

अमरावतीत धक्कादायक प्रकार, एकाच कंपनीतील 100 पेक्षा अधिक कामगारांना विषबाधा

100 workers Poisoned: अमरावतीच्या नांदगाव पेठ एमआयडीसी मधील गोल्डन फायबर कंपनी मधील कामगारांना विषबाधा झाली.

अमरावतीत धक्कादायक प्रकार, एकाच कंपनीतील 100 पेक्षा अधिक कामगारांना विषबाधा

100 workers Poisoned: अमरावतीच्या नांदगाव पेठ एमआयडीसी मधील गोल्डन फायबर कंपनी मधील 100 पेक्षा अधिक कामगारांना विषबाधा झाली आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय. कसा घडला हा प्रकार? सविस्तर जाणून घेऊया. 

अमरावतीच्या नांदगाव पेठ एमआयडीसी मधील गोल्डन फायबर कंपनी मधील कामगारांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या विषबाधेने मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. कंपनीच्या हलगर्जीपणा महिला कामगारांना पाण्यातून विषबाधा झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. 

मनसेचे पप्पू पाटील कंपनी व्यवस्थापकांविरोधात चांगलेच आक्रमक झाले असून कंपनीच्या विरोधात मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करण्यात येत आहे जवळपास 100 पेक्षा अधिक महिलांना विषबाधा झाल्याची माहिती विषबाधा झालेल्या महिलांवर अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू अनेक महिलांना उलट्यांचा त्रास होत असून कंपनीमधील पाण्यातून विषबाधा झाल्याचा संशय आहे.

Read More