Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

Amaravati Murder Case : मित्रानेच केली उमेश कोल्हेची हत्या, अंत्ययात्रेही झाला होता सहभागी

अमरवातीतल्या उमेश कोल्हे हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती

Amaravati Murder Case : मित्रानेच केली उमेश कोल्हेची हत्या, अंत्ययात्रेही झाला होता सहभागी

अनिरुद्ध दवने, झी मीडिया, अमरावती : अमरावतीमधल्या उमेश कोल्हे हत्या प्रकरणाला वेगळे वळण लागलं आहे. उमेश कोल्हे हत्या प्रकरणात सात आरोपींना अटक करण्यात आलं आहे. यापैकी एक आरोपी युसूफ खान आणि उमेश कोल्हे यांचे कौटुंबिक संबंध असल्याची माहिती उमेशचा भाऊ महेश कोल्हे यांनी दिली आहे. त्यामुळेच एकच खळबळ उडाली आहे. 

धक्कादायक म्हणजे आरोपी युसुफ खान हा उमेशच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमातही सहभागी झाल होता. व्यावसायिक संबंधांमुळे दोघांची मैत्री झाली होती. दरम्यान उमेश कोल्हे हत्या प्रकरण फास्टटॅग कोर्टात चालवण्याची मागणीही महेश कोल्हे यांनी केली आहे. 

उमेश कोल्हे यांच्या हत्येचा 16 जून रोजी कट रचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उमेश कोल्हे यांची हत्या करण्यापूर्वी 16 जून रोजी घटनेचा मास्टर माईंड इरफान खान याने सगळ्या शूटर सोबत बैठक घेतली होती. याच बैठकीत उमेश कोल्हे यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता 

उमेश कोल्हे हत्या प्रकरनात आणखी नवीन माहिती समोर आली असून कोल्हे यांच्या हत्येनंतर नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट करणाऱ्यांनी आता सोशल मीडियावर माफी मागायला सुरुवात केली आहे. अमरावतीच्या गोपाल राठी यांनी नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट शेअर केल्यानंतर व्हिडिओद्वारे माफी मागितली आहे.

Read More