Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

गरम पाण्याचा नळ तुटल्याने ४ विद्यार्थी भाजले

गरम पाण्याचा नळ तुटल्याने ४ विद्यार्थी भाजल्याची धक्कादायक घटना 

गरम पाण्याचा नळ तुटल्याने ४ विद्यार्थी भाजले

अमरावती : गरम पाण्याचा नळ तुटल्याने ४ विद्यार्थी भाजल्याची धक्कादायक घटना अमरावतीतून समोर आली आहे. धामणगाव येथील लष्करी निवासी विद्यार्थी वसतीगृहात ही घटना घडली आहे. यामध्ये एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

लष्करी शाळेतील विद्यार्थ्यांनी सकाळी आंघोळीसाठी गरम पाण्याचा नळ सुरु केला. हा नळ तुटून मोठ्या प्रमाणात गरम पाणी वाहू लागले. यात ३ विद्यार्थी जखमी झाले असून एकाची प्रकृती अधिक गंभीर आहे. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेय. ही घटना नेमकी कशी घडली ? यात कोण दोषी आहेत ? य़ाची चौकशी सुरु आहे. 

Read More