Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

महाराष्ट्रात एकदम कडक कायदा होणार? खासदार उदयनराजेंच्या थेट रायगडावरुन केल्या पाच मागण्या

महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांविरोधात कडक कायदा करण्यात यावा अशी मागणी उदयनराजेंनी गृहमंत्री अमित शाहांसमोर केलीय. या अगोदरही अनेकदा उदयनराजेंनी ही मागणी केलीय. महाराष्ट्रात सातत्यानं काहींकडून महापुरुषांचा अवमान केला जातोय. त्यामुळे उदयनराजे चांगलेच आक्रमक झाले आहेत. खासदार उदयनराजे भोसलेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसमोर किल्ले रायगडावरुन पाच मागण्या केल्या आहेत.

 महाराष्ट्रात एकदम कडक कायदा होणार? खासदार उदयनराजेंच्या थेट रायगडावरुन केल्या पाच मागण्या

Udayanraje Bhosale : महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांविरोधात कडक कायदा करण्यात यावा अशी मागणी उदयनराजेंनी गृहमंत्री अमित शाहांसमोर केलीय. या अगोदरही अनेकदा उदयनराजेंनी ही मागणी केलीय. महाराष्ट्रात सातत्यानं काहींकडून महापुरुषांचा अवमान केला जातोय. त्यामुळे उदयनराजे चांगलेच आक्रमक झाले आहेत. खासदार उदयनराजे भोसलेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसमोर किल्ले रायगडावरुन पाच मागण्या केल्या आहेत.

महापुरुषांच्या अवमानाविरोधात कायदा करा, 10 वर्ष जामीन नको.  महापुरुषांचा अवमान करणा-यांना टकमक टोकावरुन लोटलं पाहिजे असं म्हणत. उदयनराजेंनी अमित शाहांसमोर पाच मागण्या केल्या आहेत..

दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराज यांचं भव्य स्माकर उभारण्यात यावं. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बांधण्याचं आश्वासन भाजपानं दिलं होतं. दरम्यान अरबी समुद्रात स्मारकाला अडचण येत असेल तर राजभवनात स्मारक उभारावंअशी मागणी देखील उदयनराजेंनी केली आहे. 

महापुरुषांचा अवमान करणाऱ्या विकृतांवर जरब बसावी म्हणून कठोर कायद्याची गरज आहे. त्यामुळे वारंवार उदयनराजे कायदा करण्याची मागणी करत आहेत. त्यामुळे त्यांनी केलेल्या मागण्यांची दखल घेतली जाणार का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

शिवाजी माहाराजांचे विचार देशासाठी प्रेरणादायी त्यांचे विचार मर्यादीत ठेवू नका. अमित शाहांचं रायगड किल्ल्यावरून आवाहन. तर शिवाजी महाराजांनी स्वराज्यचं स्वप्न पूर्ण केल्याचं शाहांनी म्हटलंय. तसेच शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न गुजरातपासून ते देशभरात पसरवल्याचंही अमित शाहा म्हणाले. शिवाजी महाराजाच्या विचारानं देशाचा कारभार सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलंय. शिवाजी महाराजाची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्तानं अमित शाहा यांनी किल्ले रायगडावर जाऊन शिवरायांना अभिवादन केलंय.. यावेळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते. 

उदयनराजेंच्या शाहांसमोर 5 मागण्या

  1. महापुरुषांचा अवमान करणा-यांविरोधात कडक कायदा करण्याची मागणी
  2. शिवरायांचा संपूर्ण शासनमान्य इतिहास प्रकाशित करावा
  3. सिनेमॅटिक लिबर्टीच्या संदर्भात एक सेन्सॉर बोर्ड स्थापन करण्यात यावं
  4. छत्रपती शिवाजी महाराज सर्किटची स्थापना करण्यात यावी
  5. छत्रपती शिवाजी महाराज यांचं दिल्लीत स्मारक उभारण्यात यावं 
Read More