Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर खासदार कोल्हे यांनी ट्विट करत साधला निशाणा

खासदार अमोल कोल्हेंना जो प्रश्न पडलाय, तो तुम्हालाही पडलाय का?

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर खासदार कोल्हे यांनी ट्विट करत साधला निशाणा

शिरुर : राज्यात सत्तासंघर्ष एका वेगळ्याच वळणावर येऊन ठेपला आहे. आता सत्तापालट होण्याचे संकेत आहेत. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा मंगळवारी राजीनामा दिला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार अशी घोषणा देवेंद्र फडणीवस यांनी केली. 

महाराष्ट्रात राजकीय उलथापालथी नंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे. शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सत्तासंघर्षावर भाष्य करत ट्विट केले. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये खुर्ची तीच पाय तेच फक्त वरचं बूड बदललं,हुजरे तेच मुजरे तेच फक्त समोरचं धूड बदललं, फायली त्याच प्रस्ताव तेच फक्त सहीच पेन बदललं.

बोट तेच शाई तीच फक्त दाबलेला बटन बदललं,माणसं तीच भाषा तीच फक्त आतलं मन बदललं,आरोप तेच प्रकरणं तीच फक्त वातावरण बदललं,पराभूतांनं मन जिंकलं विजेत्यांनं सत्व गमावलं. मतदारांनी लोकशाहीला अन् लोकशाहीनं न्यायपालिकेला पुसलं एवढं महाभारत घडलं त्यात नेमकं कोण जिंकलं ? असा प्रश्न विचारला आहे.

Read More