मुंबई : Amol Kolhe tweet : राष्ट्रवादीचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नबाव मलिक यांना अटक केल्यानंतर त्यांना ईडीची कोठडी ठोवण्यात आली. यानंतर राष्ट्रवादीकडून जोरदार प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. सुडबुद्धीने ही कारवाई केल्याचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले होते. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. तर खासदार अमोल कोल्हे यांनी भाजपला जोरदार टोला लगावला आहे. लक्षात ठेवा! पुरून उरेल सर्वांना रांगडा राष्ट्रवादीचा गडी, असे अमोल कोल्हे यांनी ट्विट केलेय.(Amol Kolhe tweet On Nawab Malik Arrested )
मंत्री नवाब मलिक यांना तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर ईडीकडून अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यांनी ईडीच्या कार्यालयाबाहेर गर्दी केली आणि ईडीविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. याबाबत राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांकडून नवाब मालिकांना पाठिंबा दर्शवला जात आहे. आज महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात येत आहे.
सत्तेच्या माडीसाठी
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) February 23, 2022
ईडीची शिडी
विनाकारण मारी
धाडीवर धाडी
सलते सत्तेवरील
महा-आघाडी
म्हणून कमळाबाई
ती लाविते काडी
तपासयंत्रणा झाल्या
कमळीच्या सालगडी
पाकळ्यांमध्ये नाहीत का
काहीच भानगडी?
पण लक्षात ठेवा...
पुरून उरेल सर्वांना
रांगडा राष्ट्रवादी गडी#WeStandWithNawabMalik pic.twitter.com/kaw7AfG8Xj
सोशल मीडियावर नवाब मलिक यांना पाठिंबा देणारे ट्विट पोस्ट होत आहेत. ट्विटरवर 'वी स्टॅन्ड विथ नवाब मलिक' (#WeStandWithNawabMalik) असा हॅश टॅगही सुरु झाला आहे. आता राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी केलेले ट्विट जोरदार चर्चेत आहे. 'पुरून उरेल सर्वांना रांगडा राष्ट्रवादी गडी', असे कोल्हे यांनी ट्विट केले आहे. त्यांची एक कविता जोरदार व्हायरल होत आहे. या कवितेतून त्यांनी भाजपला जोरदार टोला लगावला आहे.