Amravati News: अमरावती जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. बोहल्यावर चढण्याआधीच नवरदेव बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे. अमरावतीतील काँग्रेस नेत्याचा हा मुलगा असून अमरावती पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
लग्न एक दिवसांवर असताना मुलगा अचानक बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुलाच्या वडिलांनी अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. वैभव मोहोड असं बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे. वैभव हा काँग्रेसचे नेते आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक हरिभाऊ मोहोड यांचा मुलगा असून शिवाजी महाविद्यालयात वैभव लिपिक म्हणून कार्यरत आहे.
मंगळवारी सकाळी वैभव सामान आणायला बाहेर जातो असं सांगून घराबाहेर पडला होता. मात्र बराचवेळ झाला तरी वैभव घरी परतला नव्हता. वैभव घरी न परतल्याने त्याच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. मिळालेल्या माहितीनुसार, बेपत्ता होण्यापूर्वी वैभवने सकाळीच एटीएममधून 40 हजार रुपयांची रक्कम काढली होती. त्यामुळं हे प्रकरण अधिक गुंतागुतीच झालं आहे. या प्रकरणाचा अधिक तपास फ्रेजरपुरा पोलिस करत आहेत. ऐन लग्नाच्या एक दिवस आधी मोहोड यांचा मुलगा बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली असून अमरावती पोलिसांनी वैभव मोहोड यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर देऊन भारताने पाकिस्तानचे नापास मनसुबे उधळून लावल्याची माहिती देणाऱ्या लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी व विन कमांडर व्योमिका सिंग या दोन्ही वीरांगणाचे देशात कौतुक होत असतानाच अमरावती शहरातील यशोदा नगर येथील भास्करराव सोनवणे या आदर्श शिक्षकाच्या मुलीचा विवाह पार पडला. तेव्हा मुलगी कोमल सोनवणे तिच्या हाती तिरंगा देऊन शहरातून वाजत गाजत घोड्यावरून वरात काढली आहे. देश सन्मानासह स्त्री पुरुष समानता तसेच बेटी सन्मानाचा संदेश सुद्धा या वरातीमधून देण्यात आला. भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर आम्हीही देशाच्या सैनिकांसोबत आहोत असा संदेश देत सीमेवरील भारतीय सैन्याचे मनोबल वाढवण्याच्या देखील प्रयत्न यामधून दिसून आला.