Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

अमरावतीत अंधश्रद्धेचा कळस! पोटफुगीवर उपचार म्हणून पोटावर 65 चटके दिले, 22 दिवसांचे बाळ...

Amravati News Today: अमरावतीच्या मेळघाटात अंधश्रद्धेच्या नावावर अघोरी कृत्यं केले आहे. 22 दिवसांच्या बाळाला दिले 65 चटके. 

अमरावतीत अंधश्रद्धेचा कळस!  पोटफुगीवर उपचार म्हणून पोटावर 65 चटके दिले, 22 दिवसांचे बाळ...

Amravati News Today: अमरावतीच्या मेळघाटात अंधश्रद्धेच्या नावावर अघोरी कृत्यं केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. चिखलदरा तालुक्यातील सिमोरी गावातील 22 दिवसाच्या बाळाला घरगुती उपाय म्हणून विळा तापवून 65 वेळा चटके दिले आहेत. हृदयाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेने संपूर्ण गाव सून्न झाले आहे. 

पोटफुगीवर 22 दिवसाच्या बाळाला घरगुती उपाय म्हणून विळा तापवून 65 वेळा चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अतिदुर्गम मेळघाटात अंधश्रद्धेचा कळस पाहायला मिळत आहे. या प्रकारामुळे 22 दिवसीय बाळाची प्रकृती बिघडल्याने त्याला नातेवाईकांनी सिमोरी गावावरून हातरू प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेण्यात आले होते. मात्र बाळाची गंभीर प्रकृती पाहता येथून अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले मात्र बाळ अति गंभीर असल्याने अचलपूर उपजिल्हा रुग्णालयाने या बाळाला अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात रेफर केले आहे. सध्या या बाळावर अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात उपचार सुरू आहे.

सिमोरी गावातील बेबी राजू धिकार यांना 22 दिवसांचे बाळ आहे. या बाळाला पोटफुगीसारखा आजार झाल्याने नातेवाईकांनी त्याच्या पोटावर विळा गरम करुन तब्बल 65 वेळा चटके दिले आहेत. मात्र त्यानंतर बाळाचा प्रकृती खालावल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

 दरम्यान या घटनेने मेळघाटातील आदिवासींचा अजूनही आरोग्य यंत्रणेवर विश्वास नसल्याचा स्पष्ट होत असून मेळघाटातील आदिवासी अजूनही अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन घरगुती उपाय करत असल्याचे दिसून येत आहे. अमरावतीच्या मेळघाटात असे प्रकार अनेकदा घडत असतात. आदिवासींचा आरोग्य प्रशासनावर विश्वास नाहीये. त्यामुळं ते तांत्रिक किंवा मांत्रिकाकडे जावून अघोरी उपचार करुन घेतात. मात्र हेच उपचार कधीकधी अंगलट येतात आणि जीवावर बेततात. 

Read More