Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

महाराष्ट्राच्या राजकारणात 56 चा आकडा! अनिल परब आणि चित्रा वाघ यांच्यातील वाद आणखी पेटणार

 चित्रा वाघ- अनिल परब वाद मिटला असं वाढत असतानाच हा वाद आणखी वाढणार असे संकेत मिळू लागलेत. विधानसभा अध्यक्षांच्या मध्यस्थीनंतरही चित्रा वाघ यांनी अनिल परबांवर टीका केली. तर अनिल परबांनीही चित्रा वाघ म्हणालेले 56 लोकं कोण असा सवाल उपस्थित केलाय.

महाराष्ट्राच्या राजकारणात 56 चा आकडा! अनिल परब आणि चित्रा वाघ यांच्यातील वाद आणखी पेटणार

Anil Parab On Chitra Wagh To The Point With Kamlesh Sutar : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या 56 या आकड्यावरुन नवा वाद पेटला आहे. भाजप आमदार चित्रा वाघ आणि ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांच्यातील वाद आणखी वाढणार आहे. पायाला बांधलेले ते 56 लोकं कोण आहेत? चित्रा वाघ यांनी 'त्या' 56 जणांची नावं जाहीर करावी असं आव्हान अनिल परब यांनी  झी २४ तासच्या टू द पॉईंट कार्यक्रमातून  दिले. 

अनिल परब आणि चित्रा वाघ यांच्यातली विधान परिषदेतील खडाजंगी मुद्यावरुन वैयक्तिक पातळीवर गेली होती. अनिल परब आणि चित्रा वाघ यांच्यातील वाद विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात मिटवण्यात आला. दोन्ही नेत्यांना विधानसभा अध्यक्षांनी समजूत घातली. वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका करु नये अशी समजूतही घातली. राहुल नार्वेकरांची लंच डिप्लोमसी कामी येईल असं वाटत होतं पण ही लंच डिप्लोमसी तास दोन तासही टीकली नाही. चित्रा वाघ यांनी विधिमंडळाच्या पोडियमवर येऊन पुन्हा अनिल परबांचा खरपूस भाषेत समाचार घेतला.

चित्रा वाघ शांत बसत नाही म्हटल्यावर अनिल परबही शांत बसणा-यातले नव्हते. चित्रा वाघ यांनी पायाला बांधलेल्या 56 जणांची नावं जाहीर करावीत असं आव्हान दिलंय. वाद मिटतो असं वाटत असताना दोघांमधील वाद काही मिटताना दिसत नाही. त्यामुळं दुस-या एखाद्या मुद्यावर सोमवारी अधिवेशनात पुन्हा वाद पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, भाजपच्या आमदार चित्रा वाघ एकट्या नाहीत. चित्रा वाघ यांच्या पाठीशी भाजप आणि आपण आहोत अशी ग्वाही, भाजप खासदार नारायण राणे यांनी दिली. तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांनी बढाया मारु नयेत. असा टोलाही त्यांनी लगावला. मुंबईत आयोजित पत्रकार परिसदेत ते बोलत होते. 

Read More