Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'मला खात्री होती की हे कधीही पलटतील', धस- मुंडे भेटीनंतर अंजली दमानियांची सूचक पोस्ट

Political News : 'किळस येतेय या राजकारणाची' म्हणत टीका. राज्याच्या राजकारणात आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुरु असणाऱ्या तपासादरम्यानच धस- मुंडे भेटीनं वेधलं लक्ष....   

'मला खात्री होती की हे कधीही पलटतील', धस- मुंडे भेटीनंतर अंजली दमानियांची सूचक पोस्ट

Political News : 'मला खात्री होती की हे कधीही पलटतील' असं म्हणत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुरेश धस यांच्यावर टीका केली. धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या भेटीनंतर दमानिया यांनी X च्या माध्यमातून एक पोस्ट करत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. 

राज्यात सध्या सुरु असणाऱ्या संपूर्ण राजकीय वातावरणावर भाष्य करत त्यांनी सामान्य व्यक्तीची इतकी क्रूर हत्या होऊनही इथं फक्त राजकारण सुरुय....? असा संतप्त सवाल केला. पोस्टमध्ये दमानियांनी लिहिलं, 'खूप खूप खूप राग येतोय. किळस येतेय या राजकारणाची. एका सामान्य माणसाचा इतका क्रूर मृत्यू होतो तरी हे फक्त राजकारण करणार? मी बीडला गेल्यापासून मी कधीही सुरेश धस यांच्या बरोबर मोर्च्यात गेले नाही. मला खात्री होती की हे कधीही पलटतील, मी हे धनंजय देशमुख यांनादेखील म्हटले होते'. 

धसांना हृदय आहे की नाही? धसांचे पाय कसे चालले? कसे गेले ते धनंजय मुंडेंची भेट घ्यायला? एका कुटुंबाला न्याय मिळवून देणार होता ना?, अशा शब्दांत टीकेची झोड उठवत त्यांनी धसांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्हं उपस्थित केलं. गेल्या काही दिवसांपरासून सुरु असणारे मोर्टे आणि धस यांची ओघषणाबाजी, पाहता 'इतके डायलॉग मारले ते फक्त नाटक होते?' असा खोचक सवाल त्यांनी केला. 

सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतल्यानंतर राज्यात वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंडे आणि धस यांच्यात तब्बल साडेचार तास चर्चा झाल्याची माहिती दिली. त्यानंतर धस अनेकांच्या टीकेचे धनी झाले. या दोघांमध्येही साडेचार तास चर्चा झाल्याचं म्हटलं जात असतानाच ही माहिती चुकीची असून, फक्त अर्धा तास चर्चा झाल्याचं स्पष्टीकरण खुद्द सुरेश धस यांनी दिलं. बावनकुळेंच्या घरी जेवायला गेलो होतो त्यावेळी धनंजय मुंडे अचानक आले होते. त्यावेळी अर्धातास चर्चा झाली होती, असंही ते म्हणाले. 

दमर्यान, बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. देशमुखांच्या हत्येला 66 दिवस पूर्ण होऊनही आंधळे पोलिसांना सापडलेला नाही. पोलीस यंत्रणा आणि सीआयडीची पथकं त्याचा शोध घेत असून बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केलं आहे. 

Read More