Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती बिघडली

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर पुण्यात उपचार सुरू 

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती बिघडली

पुणे: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. पुण्यातील रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. 

समाजसेवक अण्णा हजारे यांना रुबी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अशक्तपणा जाणवायला लागल्याने आज सकाळी पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांची टीम सध्या अण्णा हजारे यांच्यावर लक्ष ठेवून आहे. त्यांना डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्लाही दिला आहे. 

महाराष्ट्र भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन, लोकपाल विधेयक आंदोलन ही त्यांची गाजलेली आंदोलनं आहेत. त्यांना पद्मभूषण पुरस्कार (१९९२) पद्मश्री पुरस्कार (१९९०) इंदिरा प्रियदर्शिनी वृक्षमित्र पुरस्कार (१९८६) महाराष्ट्र सरकार का कृषि भूषण पुरस्कार (१९८९) मिळाला आहे. 

Read More