Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

लष्कराचे हेलिकॉप्टर नादुरूस्त, सटाणात इर्मजन्सी लँडिंग

भारतीय सैन्यातले शहीद लान्स नायक योगेश भदाणे यांचं पार्थिव धुळे इथे पोहोचवून परत जात असताना लष्कराचं हेलिकॉप्टर नादुरूस्त झालं. त्यामुळे ते सटाणा तालुक्यातील अजमेर सौंदाणे गावात उतरवावं लागलं.

लष्कराचे हेलिकॉप्टर नादुरूस्त, सटाणात इर्मजन्सी लँडिंग

धुळे : भारतीय सैन्यातले शहीद लान्स नायक योगेश भदाणे यांचं पार्थिव धुळे इथे पोहोचवून परत जात असताना लष्कराचं हेलिकॉप्टर नादुरूस्त झालं. त्यामुळे ते सटाणा तालुक्यातील अजमेर सौंदाणे गावात उतरवावं लागलं.

दरवाजात बिघाड

हेलिकॉप्टरच्या दरवाजात बिघाड झाला त्यामुळे हेलिकॉप्टर  उतरवावं लागलं. मात्र दोन जवान आणि पायलट यांनी स्वतःच दुरूस्ती केली आणि पुन्हा उड्डाण केलं. 

हेलिकॉप्टर पाहण्यासाठी गर्दी

मात्र हेलिकॉप्टर पाहण्यासाठी गावातल्या लहान मोठ्यांनी मोठी गर्दी केली होती. बिघाड लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला.

Read More