पुणे : Arya Taware named in the forbes list : महाराष्ट्राची कन्या आर्या तावरे (Arya Taware) हिने कमाल केली आहे. पुण्याची मराठी मुलगी आर्या तावरे हीने 'फोर्ब्ज'च्या यादीत स्थान पटकावले आहे. मूळची बारामतीकर असलेल्या आर्याने हिने जगभरात नावाजलेल्या 'फोर्ब्ज' या मासिकात स्थान मिळविले आहे. तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
युरोपमधील आर्थिक क्षेत्रातील 30 वर्षांखालील 30 प्रभावशाली व्यक्तींची यादी फोर्ब्जने जाहीर केली आहे. त्यात आर्याला स्थान मिळाले आहे. लंडन युनिव्हर्सिटीमधून बाहेर पडल्यावर आर्या तावरे (Arya Taware) हिने वयाच्या 22 व्या वर्षी एक स्टार्टअप सुरु केला. लंडनमधील छोट्या बांधकाम व्यावसायिकांना भांडवल पुरवठा करणारा हा व्यवसाय होता. तिच्या या कामाची दखल 'फोर्ब्ज' मासिकाने घेतली आहे.
युरोपमधील प्रभावशाली व्यक्तींमध्ये स्थान मिळवलेल्या आर्याने बांधकाम व्यावसायिकांसाठी निधी उपलब्ध करण्यासाठी स्टार्टअप सुरु केले. आर्थिकदृष्ट्या प्रभावशाली समजल्या जाणाऱ्या पहिल्या तीस व्यक्तींमध्ये तिचा समावेश आहे.
Incredible news just in ...
— FutureBricks (@Future_Bricks) May 4, 2022
Our Founder and CEO @arya_taware has made the @Forbes 30 Under 30 list (Europe, Finance)
See the full list here: https://t.co/gFBdWskMVq. Can you spot Arya's name? #ForbesUnder30 pic.twitter.com/rniMoRUbuw
तसेच याशिवाय या क्षेत्रातील विशेषज्ञांना तसेच गुंतवणूकदारांना एकत्र आणणारे पोर्टल म्हणूनही या स्टार्टअपने भूमिका बजावली. या कंपनीचे नाव 'फ्युचरब्रीक्स' असे आहे. या कंपनीची आजचे बाजारमूल्य 32.7 कोटी पौंड इतके असून ते आज 22 वेगवेगळ्या बांधकाम प्रकल्पांवर काम करत आहे. आर्याचे कुटुंब बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील आहे.