Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'वारीत कुणालाही येण्याची परवानगी पण...' विठ्ठल मंदिरातून मुख्यमंत्र्यांनी कोणाला दिला इशारा?

CM Devendra Fadanvis:  देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त आज पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय पूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडली.

'वारीत कुणालाही येण्याची परवानगी पण...' विठ्ठल मंदिरातून मुख्यमंत्र्यांनी कोणाला दिला इशारा?

CM Devendra Fadanvis: देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त आज पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय पूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडली. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी अमृता व कन्या दिवीजा उपस्थित होत्या. यावेळी विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनाने मन प्रसन्न झाले आणि विठुमाऊली व रखुमाईच्या चरणी नतमस्तक होत राज्यातील शेतकरी, कष्टकरी व सर्व जनतेच्या सुख-समृद्धी व महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रार्थना केल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील विविध मुद्द्यांवर भाष्य केले. आषाढी पूजेनंतर काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस? सविस्तर जाणून घेऊया. 

देवाकडे काही मागावं लागत नाही. देवाला सर्व माहिती असतं. हे संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. माऊलीने महाराष्ट्राची काळजी घेण्याची शक्ती आम्हाला द्यावी. सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी. सगळ्यांना विश्वासात घेऊन कॉरिडॉर होणा आहे. कुणाचेही नुकसान होणार नाही. योग्य पुनर्वसन केले जाणार असून जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांशी चर्चा केली आहे. कुणालाही उध्दवस्त न करता कॉरिडॉर प्रकल्प राबवणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 

मी विठ्ठलाला शेतकऱ्यांचे कल्याण मागितले आहे. यामध्ये सर्व काही आले, असे म्हणत त्यांनी शेतकरी कर्ज माफीबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले. विरोधकांनी सुबुद्धीने चालावे. विजय उत्सवाला रुदालीचे स्वरूप दिलं तसं मला आनंद उत्सवाला राजकीय उत्तर द्यायचे नाही, असे म्हणत त्यांनी ठाकरे बंधुंच्या विजयी मेळाव्याबद्दल बोलणे टाळले. 

ड्रोनच्या माध्यमातून वारकरी मोजण्यात आले. ए आयचा वापर यावेळी वारीत केला गेला. वारीसाठी सर्व यंत्रणांना बळकट करणार असल्याचे ते म्हणाले. या वारीत स्वच्छता सर्वत्र दिसून आली याचा आनंद आहे.

मंदिर सरकारीकरणच्या विरोधाची विश्व हिंदू परिषदेचे देखील भूमिका आहे.  मंदिर भक्तांच्या हातात असावं पण ज्याठिकाणी कारभार मोठा असतो तिथे कायदा करावा लागतो, असे ते म्हणाले.  वारीत कुणालाही येण्याची परवानगी आहे पण येताना देवाच्या भक्तीने इथे या आपला अजेंडा चालवण्यासाठी कोणी येत असेल तर चालणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Read More