Ashadhi Wari 2025: आषाढी वारीला सुरूवात झाली आहे. आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी वैष्णवांचा मेळावा पंढरीच्या दिशेने रवाना झाला आहे. विठुरायाच्या भेटीची ओढ या प्रत्येकाच्या मनात आहे. अशातच पालखी प्रस्थान सोहळ्यालाही सुरुवात झाली आहे. देहू आणि आळंदी या दोन्ही ठिकाणी वारकऱ्यांचा मेळावा जमा झाला आहे. आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान पंढरपूरकडे रवाना झाले. तर उद्या 19 जून रोजी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. पालखी सोहळा पाहणे हे भाग्याचं लक्षण असल्याचं म्हटलं जातं. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होताना मंदिरात एक चमत्कार घडतो अशी अख्यायिका आहे. काय आहे ही अख्यायिका जाणून घेऊयात.
ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे पंढरीला जाण्यासाठी प्रस्थान होते. हा सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक आवर्जून उपस्थित असतात. माऊली आणि ग्यानबा तुकारामच्या गजर मंत्रमुग्ध करणारा आहे. माऊलींच्या पादूका मंदिरातून पालखीत ठेवल्या जातात, तेव्हा वारकरी आपसूकच गहिवरतात. माऊलींच्या पादुका मंदिरातून भाविकांकडून उचलण्याचा प्रसंग येतो तेव्हाच एक चमत्कार घडतो. हा चमत्कार बघण्यासाठी लाखो वारकरी श्वास रोखून उभे असतात.
माऊलीच्या पादूका मंदिरातून उचलण्याचा प्रसंग येतो तेव्हा मंदिरावरील कळस हलतो. मंदिर सोडत असताना तो कळस हलतो, अशी अख्यायिका आहे. हे दृष्य पाहण्यासाठी लाखो वारकरी उत्सुक असतात. माऊली बाहेर येण्याची जी वेळ असते त्या वेळेसच सर्वच वारकऱ्यांच्या नजरा या कळसाकडेच असतात.
प्रस्थान- 19 जून 2025
पंढरपूरमध्ये आगमन- 5 जुलै
आषाढी एकादशीः 6 जुलै 2025
19 जूनः आळंदी - येथून प्रस्थान
20 जूनः पुणे (भवानीपेठ) – रात्रभर मुक्काम
21 जूनः पुणे - सामुदायिक कार्यक्रम
22 जूनः सासवड - भक्ती यात्रा
23 जूनः सासवड - भजन आणि सेवा
24 जूनः जेजुरी - आध्यात्मिक प्रवचने
25 जूनः वेल्हे - स्थानिक संवाद
26 जूनः लोणंद - प्रमुख मुक्काम
27 जूनः तरडगाव - निरवसमाधी विधी
28 जूनः फलटण - स्थानिक वारी परंपरा
29 जूनः बरड - विश्रांतीचा दिवस
30 जूनः नातेपुते - नामजप आणि कीर्तन
1 जुलै : माळशिरस – अल्पोपहार शिबिरे
2 जुलै: वेळापूर - भक्ती मेळावे
3 जुलैः भंडीशेगाव – अंतिम मुक्काम
4 जुलैः वाखरी - पंढरपूरपूर्वीचा शेवटचा मुक्काम
5 ५ जुलै : पंढरपुरात आगमन
6 जुलैः आषाढी एकादशी - विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शन