Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

भाजप नोटीशीवर नाराज आमदार देशमुख यांची प्रतिक्रिया

भारतीय जनता पक्षानं बजावलेल्या नोटीसीला आपण योग्य वेळी उत्तर देऊ अशी प्रतिक्रिया, भाजपचे नाराज आमदार आशिष देशमुख यांनी दिली आहे. 

भाजप नोटीशीवर नाराज आमदार देशमुख यांची प्रतिक्रिया

नागपूर : भारतीय जनता पक्षानं बजावलेल्या नोटीसीला आपण योग्य वेळी उत्तर देऊ अशी प्रतिक्रिया, भाजपचे नाराज आमदार आशिष देशमुख यांनी दिली आहे. 

आशिष देशमुख हे नागपूरमधल्या काटोलचे आमदार आहेत. बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बौद्धिकाला गैरहजर राहिल्याप्रकरणी आशिष देशमुख यांना भाजपनं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 

विशेष म्हणजे आशिष देशमुख यांनी यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दोन वेळा पत्र लिहून सरकारच्या कामावर टीका करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर भाजप आणि आशिष देशमुख यांच्यातला दुरावा वाढत चालला आहे. 

Read More