Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

सरकारला जाब विचारण्यासाठी जनसंघर्ष यात्रा - अशोक चव्हाण

पुण्यात यात्रेचा पहिला टप्पा संपणार...

सरकारला जाब विचारण्यासाठी जनसंघर्ष यात्रा - अशोक चव्हाण

कोल्हापूर : केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारनं जनतेची घोर फसवणूक केलीय. या सरकारला जाब विचारण्यासाठी आणि काँग्रेसनं जनसंघर्ष यात्रा काढलीय, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलंय. केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेला सुरूवात आज कोल्हापुरात सुरूवात झाली.

या यात्रेत राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, यांच्या सह पश्चिम महाराष्ट्रातले सगळे बडे काँग्रेस नेते उपस्थित आहेत. पहिल्या टप्प्याची सुरूवात कोल्हापुरातून झाल्यावर पुढे यात्रा सांगली, सातारा, आणि पुणे जिल्ह्यात जाणार आहे. पुण्यातच यात्रेचा पहिला टप्पा संपेल.

आज दसरा चौकात छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून यात्रा सुरू झाली. कोल्हापुरातल्याच केशवराव भोसले सभागृहात सभा आयोजित करण्यात आलीय.  

Read More