Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

अर्ज दाखल करण्यासाठी झाशीच्या राणीच्या वेशात अवतरल्या उमेदवार

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या उमेदवाराला पाहण्यासाठी जनतेनंही गर्दी केली होती

अर्ज दाखल करण्यासाठी झाशीच्या राणीच्या वेशात अवतरल्या उमेदवार

रविंद्र कांबळे, झी २४ तास, सांगली : हटके स्टाईलने आंदोलन करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या समाजसेविका जयश्री पाटील यांनी गुरुवारी विधानसभा निवडणूक २०१९ साठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. जयश्री पाटील या अपक्ष म्हणून निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्यात. हा अर्ज दाखल करण्यासाठीही त्या जरा हटके स्टाईलनंच जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाल्या.

झाशीच्या राणीची वेशभूषा परिधान करत जयश्री पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. 

fallbacks
जयश्री पाटील, काँग्रेसच्या उमेदवार

याआधीही, पूरग्रस्तांना मदत मिळत नसल्याचं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'जनसंवाद यात्रे'त घुसून त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोरच आंदोलन केलं होतं. त्यानंतर त्या चर्चेत आल्या होत्या. आज त्यांनी झाशीच्या राणीच्या वेशात येत अनेकांचं लक्ष आपल्याकडे खेचून घेतलं. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या उमेदवाराला पाहण्यासाठी जनतेनंही गर्दी केली होती. 

सांगलीमध्ये युतीकडून भाजपाकडून सुधीर गाडगीळ यांना संधी देण्यात आलीय. 

Read More