Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

नाशकात ३५ शिवसेना नगरसेवकांची बंडखोरी

शिवसेना आणि भाजपाला राज्यात बंडखोरांचा मोठा फटका बसताना दिसत आहे.

नाशकात ३५ शिवसेना नगरसेवकांची बंडखोरी

नाशिक : शिवसेना आणि भाजपाला राज्यात बंडखोरांचा मोठा फटका बसताना दिसत आहे. बाहेरच्या पक्षातून आयात केलेल्या नेत्यांना उमेदवारी दिल्याने पक्षात बंडखोरी वाढल्याचे चित्र सगळीकडे दिसत आहे. अनेकांनी अपक्ष म्हणून अर्ज भरले असून त्यांची बंडखोरी शमवण्यात शिवसेना-भाजपाला अपयश आले आहे. बंडखोर आपल्या निर्णयावर ठाम असल्याने पक्षातून त्यांची हकालपट्टी करण्यात येत आहे. नाशिक शहरात महापालिकेतील 35 शिवसेना नगरसेवकांची बंडखोरी केल्याचे समोर येत आहे. 

पश्चिम विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे बंडखोर विलास शिंदे यांना पाठींबा देणार आहेत. भाजपच्या उमेदवार सीमा हिरे यांच्या विरोधात सेनेचे उघड बंड पाहायला मिळत आहे. पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी आणि नगरसेवक यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली आहे.

Read More