Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

...जेव्हा निवडणूक अधिकाऱ्यांनाही करावा लागतो बैलगाडीतून प्रवास!

हे दृश्य एखाद्या दुर्गम किंवा डोंगराळ भागातील नसून पुणे जिल्ह्यातील विकसित समजल्या जाणाऱ्या शिरूर तालुक्यात दिसलं

...जेव्हा निवडणूक अधिकाऱ्यांनाही करावा लागतो बैलगाडीतून प्रवास!

हेमंत चापुडे, झी २४ तास, शिरूर - पुणे : विधानसभा निवडणूक २०१९ साठी राज्यातील २८८ विधानसभा मतदार संघात सोमवारी मतदान होतंय. यासाठीच आजच (रविवारी) निवडणूक अधिकाऱ्यांनी सर्व मतदान केंद्रांवर मतदान यंत्र पोहचवण्याचं काम पार पाडलं. परंतु, या दरम्यान पुणे जिल्ह्याच्या शिरूर हवेली विधानसभा मतदार संघात निवडणूक अधिकाऱ्यांना मात्र एक वेगळाच अनुभव आला. 

तालुक्यातील तळेगाव ढमढेरे इथल्या तांबूळ ओढा आणि दराखे वस्तीवर जाण्यासाठी पक्का रस्ताच अस्तित्वात नाही. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून बरसत असलेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यावर चिखलच-चिखल दिसतोय. त्यामुळे, निवडणूक अधिकाऱ्यांना १७३ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर जाण्यासाठी चक्क बैलगाडीचा वापर करावा लागला. 

fallbacks
Caption

उल्लेखनीय म्हणजे, हे दृश्य एखाद्या दुर्गम किंवा डोंगराळ भागातील नसून पुणे जिल्ह्यातील विकसित समजल्या जाणाऱ्या शिरूर तालुक्यात दिसलं. निवडणूक अधिकाऱ्यांना मतदान यंत्र बैलगाडीत टाकून मतदान केंद्रावर न्यावी लागली.

या रस्त्याबाबत स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी तहसिलदार, ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधी यांना निवेदन देवून रस्ता बनवण्याची वेळोवेळी मागणी केलीय. 

परंतु ग्रामस्थांच्या समस्यांकडे मात्र सर्वांनीच दुर्लक्ष केल्याने स्थानिक नागरिकांना, शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना, वृद्ध नागरिकांना अशाच स्थितीत प्रवास करावा लागत आहे. 

Read More