Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'कोविड रुग्णाला मारून टाक', डॉक्टरची ऑडिओ क्लिप व्हायरल; महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

'कोविड रुग्णाला मारून टाक' अशी चिथावणी देणाऱ्या एका वरिष्ठ डॉक्टरची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 

'कोविड रुग्णाला मारून टाक', डॉक्टरची ऑडिओ क्लिप व्हायरल; महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

कोरोना महामारीच्या कठीण काळात रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा जीवतोड प्रयत्न करत असतानाच वैद्यकीय क्षेत्राची मान शरमेनं खाली जाईल अशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 'कोविड रुग्णाला मारून टाक' अशी चिथावणी देणाऱ्या एका वरिष्ठ डॉक्टरची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 

कोरोना महामारीनं देशभर थैमान घातले होते. रुग्णालयात बेड मिळणं कठीण झालं होतं. लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरातील शासकीय सामान्य रुग्णालय आणि अन्य तीन ठिकाणी कोविड सेंटर कार्यरत केली होती. याच काळातील एक ऑडिओ क्लिप आता समोर आली आहे. यात 2 वैद्यकीय अधिकाऱ्यांमधील संवाद ऐकायला मिळतोय. या क्लिपमध्ये उदगीर शासकीय रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शशिकांत देशपांडे आणि कोविड सेंटरवर नियुक्त डॉ. शशिकांत डांगे यांच्यात फोनवर संभाषण झाल्याचं ऐकायला मिळत आहे. डॉ. देशपांडे कोव्हिडच्या रुग्णाला चक्क मारून टाकण्याची भाषा करत आहेहेत.या ऑडिओ क्लीपमुळे मोठी खळबळ उडाली आहे. 

वैद्यकीय नैतिकतेच्या सर्व मर्यादा ओलांडणारा हा प्रकार आहे. एका जीवाला वाचवण्याऐवजी त्याचा अंत करण्याची अशा स्वरूपाची चिथावणी वरिष्ठ डॉक्टरांकडून देण्यात येणं, ही बाब केवळ धक्कादायक नाही, तर संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राच्या निष्ठेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.


लातूर जिल्ह्यातील दोन डॉक्टरांमध्ये झालेला संवाद खालीप्रमाणे - 


( डॉक्टर 1 अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शशिकांत देशपांडे ) : राऊंड घ्या अन् पेशंट पटापट काढायचे बघा जरा... ओटू कॉन्स्ट्रेट काही रिकामे आहेत का काही.....

( डॉक्टर 2 डॉ. शशिकांत डांगे ) : नाही नाही... एकपण नाही... दोनवर दोन पेशंट आहेत. अन् एक जण गाडीत आहे. शिफ्ट करताना अवघड व्हायलेय म्हणून गाडीतच ऑक्सिजन लावले आहे....

( डॉक्टर 1 अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शशिकांत देशपांडे ): अरे, मध्ये कुणाला जाऊ देऊ नको अन् त्या दायमीला मारून टाक की, मायला तुलाही त्याचे (जातीय उल्लेख) लई पडलेय पहिल्यापासून..

( डॉक्टर 2 डॉ. शशिकांत डांगे ): कुणाला...

( डॉक्टर 1 अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शशिकांत देशपांडे ) ::-  एवढे मोठे ओटू जातेय त्या दायमीला...

( डॉक्टर 2 डॉ. शशिकांत डांगे ) : नाही नाही... कमी केलेय की रात्रीपासून दोन लिटरवर आणलेय सगळ्याला...

( डॉक्टर 1 अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शशिकांत देशपांडे )  : बघा बघा... कमी पडले तर मागू नका आम्हाला काही...

( डॉक्टर 2 डॉ. शशिकांत डांगे ) : हा...

या ऑडिओ क्लिपमध्ये उल्लेख असलेली महिला म्हणजे दायमी गौसोद्दीन असल्याचं निष्पन्न झालं आहे. या महिलेच्या पतीनं सदर संवाद ऐकून तत्काळ उदगीर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर डॉ. शशिकांत देशपांडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, सद्य:स्थितीत या क्लिपची सत्यता पोलीस तपासत असून झी 24 तास या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही

रुग्णसेवा ज्यांच्या हातात विश्वासानं सोपवली जाते, त्या डॉक्टरांकडून अशाप्रकारचा असंवेदनशील संवाद समोर आला आहे. त्यामुळे संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. समाजात संतापाची लाट पसरली असून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Read More