Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

औरंगाबाद महापालिका आयुक्त दीपक मुगळीकर यांची बदली

गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहरातील कचरा प्रश्न चांगलाच पेटला आहे. हा प्रश्न आयुक्त दीपक मुगळीकर यांना भोवला आहे. 

औरंगाबाद महापालिका आयुक्त दीपक मुगळीकर यांची बदली

औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहरातील कचरा प्रश्न चांगलाच पेटला आहे. हा प्रश्न आयुक्त दीपक मुगळीकर यांना भोवला आहे. 

औरंगाबाद महापालिका आयुक्त दीपक मुगळीकर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. तर जिल्हाधिका-यांकडे मनपा आयुक्तपदाचा अतिरीक्त पदभार सोपवण्यात आला आहे. अवघ्या दहा महिन्यात दीपक मुगळीकर यांना बदलीला सामोरं जावं लागलं आहे. कचरा प्रश्न त्यांना सोडवण्यात न आल्याने त्यांची बदली झालीये.

पी.वेलारसु यांचीही बदली

दुसरीकडे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे वादग्रस्त आयुक्त पी. वेलारसु यांची बदली झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांनी वेलारसु यांच्या बदलीची फाईल मंजूर करून सामान्य प्रशासन विभागाकडे पाठवली आहे. वेलारसु यांनी कल्याण-डोंबिवलीतील कचऱ्याचा प्रश्न हाताळताना अत्यंत हलगर्जीपणा दाखवल्याचा त्यांच्यावर आऱोप आहे. 

Read More