Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

पालिका उपायुक्तांना संतप्त नागरिकांची मारहाण

पालिका उपायुक्तांना संतप्त नागरिकांची मारहाण 
 

पालिका उपायुक्तांना संतप्त नागरिकांची मारहाण

औरंगाबाद : औरंगाबाद महापालिकेचे उपायुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांना मारहाण कराण्यात आलीय. नाल्यात माणूस वाहून गेला त्या ठिकाणची पाहणी करण्यास गेले असताना संतप्त नागरिकांकडून भालसिंग यांना मारहाण झाली. नाल्यात वाहून गेल्याने एका युवकाचा मृत्यू  झालाय.

नाल्यात पडून मृत्यू 

बजरंग चौक परिसरात ही दुर्घटना घडली. चेतन चोपडे हा 38 वर्षीय युवक नाल्यात पडला होता. रात्री पावसामुळं नाला दुथडी भरून वाहत होता. रस्त्याच्या शेजारीच नाला असल्याने त्याला अंदाज आला नाही आणि त्याच्या बुलेट गाडीसह तो नाल्यात पडला होता. 

Read More