Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

गावगुंडांच्या त्रासाला कंटाळून १७ वर्षीय मुलीची आत्महत्या

 १७ वर्षीय तरुणीने गावातील मुलांच्या त्रासाला कंटाळून गळफास घेतलाय.

गावगुंडांच्या त्रासाला कंटाळून १७ वर्षीय मुलीची आत्महत्या

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालूक्यातील तांदूळवाडी १७ वर्षीय तरुणीने गावातील मुलांच्या त्रासाला कंटाळून गळफास घेतलाय. गावातील गावगुंड फोन करून नेहमी त्रास देते होते असा कुटुंबियांचा आरोप आहे.

आधीही आत्महत्येचा प्रयत्न 

गेले काही महिने हा त्रास सुरू होता. जेव्हा तिचे आईवडील कामाला जायचे तेव्हा तिला फोन यायचे. गेल्या आठवड्यातही तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यासंदर्भात तिने आपल्या आईवडीलांनाही सांगितले होते.

गावातील गावगुंड तिला नेहमी फोन करून त्रास द्यायचे असा आरोप तिच्या नातेवाईकांनी केलाय. तिच्या आईवडीलांनी या गावगुंडांच्या पालकांनाही याबद्दल समज दिली होती.  पण वेळीच या गंभीर गोष्टीची दखल न घेतल्याने एका मुलीला आपला जीव गमवावा लागलायं. 

Read More