Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

Aurangzeb Tomb: 'या' एका कारणामुळे कुणीच औरंगजेबची कबर हटवू शकत नाही?

संभाजीनगर औरंगजेबची कबर आहे. या कबरीवरुन मोठा वाद सुरु असून कबर हटवण्याची मागणी केली जात आहे. 

Aurangzeb Tomb: 'या' एका कारणामुळे कुणीच औरंगजेबची कबर हटवू शकत नाही?

Aurangzeb Tomb In Maharashtra Sambhaji Nagar :  जुलमी मुघल शासक अशी ओळख असलेल्या औरंगजेबची कबर सध्या वादाचा विषय बनली आहे. औरंगबेची कबर हटवण्याची मागणी केली जात आहे  संभाजीनगरच्या औरंगजेबाच्या कबर परिसरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. औरंगजेबाच्या कबरीजवळ पोलिसांसह SRPF ची एक तुकडी तैनात करण्यात आलीये. ओरंगजेबाच्या कबरीबाबत सातत्यानं होत असलेल्या विधानानंतर सतर्क म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. . मात्र, एका कारणामुळे कुणीच  औरंगजेबची कबर हटवू शकत नाही. 

अबू आझमींनी औरंगजेबाचं उदात्तीकरण केल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले चांगलेच संतापले.  त्यांनी औरंगजेबाची कबर ठेवण्याची काय गरज असा सवाल उपस्थित करत औरंगजेबाची कबर उखडून टाका, असं विधान केले होते. औरंगजेबची कबर काढली पाहिजे असं विधान मंत्री संजय शिरसाट यांनी केलंय. आमच्या राजाला छळणा-याची कबर नको, असंही शिरसाट यांनी म्हटलंय. शिवाजी महाराज सांगण्यासाठी औरंगजेब पाहिजे, असं सांगणा-या अंबादास दानवेंनी कबरीवर जाऊन नमाज पडावी, अशी टीकाही शिरसाटांनी दानवेंवर केली.

संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी जोर धरतेय. अशातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठं वक्तव्य केलंय. औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास पुसण्याचा प्रकार आहे. असं ते म्हणाले. तर विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांनी स्टंट करू नये. अशी टीकाही त्यांनी केली. औरंगजेबाची कबर म्हणजे विरत्वाची  कबर नाही तर ती कबर क्रूर पणाची आहे. असंही सपकाळ म्हणाले.

 3 मार्च, 1707साली नगरच्या भिंगार किल्ल्यात औरंगजेबाचा मृत्यू झाला. आपल्याला खुलताबादला दफन करावं अशी औरंगजेबाची इच्छा होती. त्यानुसार त्याचा मुलगा आझम शाह यानं खुलताबादमध्ये त्याची कबर बांधली. औरंगजेबच्या कबरीला  एएसआय अर्थात भारतीय पुरातत्व सर्वेक्षणचे संरक्षण मिळाले आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या संरक्षणाखाली हजारो स्मारके आहेत. या स्मारकांच्या यादीत औरंगजेबची कबर देखील आहे. यामुळे कायद्याने या कबरीवर कारवाई करता येत नाही.  काही गोष्टी कायद्याने कराव्या लागतात असं म्हणत  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगजेबच्या कबरीला जुन्या काँग्रेसच्या काळात एएसआयचं संरक्षण मिळालं असल्याची प्रतिक्रिया दिली होती. 

 

Read More