Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

मलंगगडावर आरती करण्यासाठी जाताना अविनाश जाधव यांना पोलिसांनी रोखलं

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी अविनाश जाधव यांना रोखलं.

मलंगगडावर आरती करण्यासाठी जाताना अविनाश जाधव यांना पोलिसांनी रोखलं

कल्याण : मलंगगडावर आरती करण्यासाठी जात असताना मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना पोलिसांनी रस्त्यात रोखलं आहे. मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना पोलिसांनी अडवून नेवाळी पोलीस चौकीत आणलं आहे. 

अविनाश जाधव हे मलंगगडावर आरती करण्यासाठी जाणार होते. मात्र कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी त्यांना काकडवाल गावाजवळ अडवलं आणि नेवाळी पोलीस चौकीत आणलं.

उल्हास परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, अंबरनाथचे सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक नरळे हे अविनाश जाधव यांच्याशी चर्चा करत आहेत. अविनाश जाधव यांच्यासोबत मनसेचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत.

Read More