Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

बालभारतीकडून दुसरीच्या अभ्यासक्रमात मोठा बदल

पहिल्याच दिवशी दुसरीच्या शिक्षकांना हा मोठा धक्का बसला आहे.

बालभारतीकडून दुसरीच्या अभ्यासक्रमात मोठा बदल

दीपाली जगताप-पाटील, झी मीडिया, मुंबई : बालभारतीकडून दुसरीच्या अभ्यासक्रमात मोठा बदल करण्यात आला आहे. संख्या वाचन करताना एकवीस ऐवजी वीस एक, त्र्याहत्तर ऐवजी सत्तर तीन, त्र्याण्णव ऐवजी नव्वद तीन असं वाचन करण्यात येणार आहे. जोडाक्षर न वापरता असे संख्या वाचन करण्याचा पाठ गणिताच्या पुस्तकात दिला जाणार आहे. या शैक्षणिक वर्षापासून दुसरीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला आहे.  पहिल्याच दिवशी दुसरीच्या शिक्षकांना हा मोठा धक्का बसला आहे. कारण इतक्या वर्षांपासून सुरु असलेलं संख्यांचं वाचन आता बदलावं लागणार आहे.

fallbacks

विनोद तावडे यांच्याकडून शिक्षण विभाग काढून घेतलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे खातं वादात होतं. युती सरकारच्या तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही मंत्र्यांना झटका दिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून विविध कारणांनी चर्चेत असलेलं शालेय शिक्षण खाते हे विनोद तावडे यांच्याकडून काढून नव्यानेच मंत्रिमंडळात समावेश झालेल्या आशिष शेलार यांच्याकडे देण्यात आले आहे.

 

Read More