Bangladeshi Woman: फेसबुकवरून ओळख झालेल्या 26 वर्षीय बांगलादेशी युवतीसोबत नाशिकमधील युवकाने धर्मांतर करत मुस्लिम रितीरिवाजाप्रमाणे लग्न केल्याचे उघडकीस आले आहे. ती बांगलादेशहून लपून-छपून भारतात यायची. ती नाशिकच्या युवकासोबत मुंबईत लिव्ह इन आणि लग्नानंतर नाशिकमध्ये तीन वर्षांपासून राहत आहेत. पोलिसांनी तिला सापळा रचून अटक केली.
विशेष म्हणजे तिने नाशिकमध्ये विधानसभा निवडणुकीत मतदान केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आल्याची माहिती समोर आली आहे. युवती बेकायदेशीररित्या कलकत्त्यामार्गे बांगलादेशात गेली. त्यानंतर ती गर्भवती असल्याचे तिला समजले. तिने मुलीला जन्म दिला. ही बाब युवकाला समजली. तिला भेटण्यासाठी तो बांगलादेशात विमानाने 10 वेळा गेल्याचे समोर आले आहे.
तिच्यासाठी त्याने धर्मांतर करत मुस्लिम रितीरिवाजाप्रमाणे लग्नही केले. त्यावेळी त्यांची मुलगी चार वर्षाची होती. गेल्या तीन वर्षांपासून ती नाशिक शहरातील मुंबई नाका परिसरात युवकासोबत राहत होती. तिची मुलगी नाशिकमधील एका शाळेत शिक्षण घेत असल्याची माहिती आहे. पोलिसांनी तिला फसवणूक केल्याप्रकरणी, बनावट कागदपत्रे तयार केल्याने व परकीय नागरिक असल्याने अटक केली आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत दाखल करण्यात आला आहे.
29 वर्षीय युवती 2017 मध्ये मुंबईत नातलगांकडे आली होती. फेसबुकवरून तिची नाशिकच्या युवकाशी मैत्री झाली. 2017 बांगलादेशमध्ये बेकायदेशीररित्या गेल्यावर गर्भवती असल्याचे समजले. युवतीने मुलीला जन्म दिला. युवतीला भेटण्यासाठी युवकाने १० वेळा विमानप्रवास केला. तसेच मुस्लिम धर्म स्वीकारून त्याने युवतीशी निकाह केला. लग्नावेळी मुलगी 4 वर्षांची होती. बांगलादेशी पासपोर्ट काढून 3 महिन्यांच्या व्हिसावर 2021 मध्ये ती भारतात आली.
व्हिसा संपूनही ती भारतात राहिली. पासपोर्ट फाडून ती नाशिकमध्ये राहिली. 3 वर्षांपासून नाशिक शहरात प्रियकरासोबत वास्तव्य केले. प्रियकरासोबत एकाचवेळी देहरादून, शिमला, गोवा, लोणावळा असा प्रवास करत मुंबईला पोहोचली. देशभर पर्यटन केल्याचे तिचे फोटो पोलिसांना मिळाले.