Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

बारामती हादरली! 11 वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; घरात कोणी नसल्याचं पाहून आरोपीने...

Baramati Crime News: या प्रकरणाची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्त्यांबरोबर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

बारामती हादरली! 11 वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; घरात कोणी नसल्याचं पाहून आरोपीने...

Baramati Crime News: बारामती तालुक्यातील मुर्टी येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका 11 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करण्यात आला आहे. सदर घटनेची माहीती मिळताच वरीष्ट अधिकारी, समाजसेवकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

नेमकं घडलं काय?

घरात कुणीही नसल्याचं फायदा घेऊन एका 11 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याची घटना बारामती तालुक्यातील मूर्टी येथे घडली आहे. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. अण्णा किसन गोफणे (रा. मोराळवाडी, ता. बारामती) असं या प्रकरणी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास पिडीत मुलगी ही घरात एकटी होती. त्यावेळी आरोपी अण्णा गोफणे याने जबरदस्तीने घरात प्रवेश करत या चिमुरडीवर अत्याचार केला. ही घटना समजल्यानंतर संबंधित पीडितेच्या कुटुंबीयांनी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात धाव घेतली.

आदिवासी लोकांवर अन्यायाच्या घटना वाढल्या

घटनेच्या ठिकाणी पंचनामा करताना बारामतीचे उपविभागीय दंडाधिकारी वैभव नारवडकर, बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिक्षक डाॅ. सुदर्शन राठोड व आदिवासी समाजसेवक नामदेव भोसले, सर्व तपासी अधिकारी आणि पिढीत कुटुंबातील सदस्यांबरोबर स्थानिक ग्रमस्त उपस्थित होते. सदर घटनेमुळे पुणे जिल्हा हादरला असून पुणे जिल्हामध्ये आदिवासी लोकांवर अन्यायाच्या घटना वाढत आहेत. हे आदिवासी लोक पोटाची खळगी भरण्यासाठी वन-वन भटकंती करतात आणि हे पिडीत लोक शासकीय सोयीसुविधांपासून वंचित राहातात. अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे आदिवासी लोकाकांची उपामार होत आहे, असे मत नामदेव भोसले यांनी व्यक्त केले आहे. या प्रकरणामधील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे.

वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा दाखल

या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी अण्णा गोफणेवर भारतीय न्यायसंहिता कलम 65 (2), 332 (अ), बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा  कलम 4 (2), 6, अनुसूचित जाती जमाती कायदा कलम 3(1) नुसार गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. याबाबत अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड हे करीत आहेत. 

Read More