Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

पावसामुळं कहर! बारामतीत निरा डावा कालवा फुटला; नागरिकांच्या घरात पाणी, तीन इमारती खचल्या

Baramati Rainfall Alert: बारामती आणि दौड परिसरात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. रविवारी झालेल्या जोरदार पावसामुळे बारामतीतील नीरा कालवा फुटला आहे त्यामुळं घरांत पाणी शिरले आहे. 

पावसामुळं कहर! बारामतीत निरा डावा कालवा फुटला; नागरिकांच्या घरात पाणी, तीन इमारती खचल्या

Baramati Rainfall Alert: बारामती आणि इंदापूर तालुक्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. नीरा कालवा फुटल्याने या भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक घरांत पाणी शिरले असून NDRFची दोन पथकं परिसरात दाखल करण्यात आली आहेत. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नीरा कालव्याचे पाणी घरात शिरल्याने जवळपास 8-10 जणांचे संसार उघड्यावर आले आहेत. 

बारामती आणि दौड परिसरात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. रविवारी झालेल्या जोरदार पावसामुळे बारामतीतील नीरा कालवा फुटला असून अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय. पाणी पालखी महामार्गावर आले असून काटेवाडी-भवानीनगर रस्ता बंद झाला आहेत. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  NDRFच्या दोन टीम परिसरात तळ ठोकून आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूरस्थितीची पाहणी केली आहे. 

बारामती मधील एमआयडीसी पेन्सिल चौकाशेजारील तीन इमारती पावसाने खचल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे घटनास्थळी दाखल झाले असून अजित पवारांकडून इमारतीची पाहणी करण्यात आली. साईरंग, ऋषिकेश आणि श्री समर्थ अशी इमारतींची नावे असून सद्यस्थितीत सर्व फ्लॅट रिकामे करण्यात आले आहेत. 

कॅनल फुटल्यामुळं परिसरात शिरलेले पाणी अद्यापही ओसरले नाहीये. कारण कॅनलचा प्रवाह अद्यापही बंद करण्यात आलेला नाहीये. त्यामुळं नागरिकांच्या घरात आणि शेतांमध्ये अद्यापही पाणी शिरलेले पाहायला मिळतेय. रस्त्यांवरही पाणी आलं आहे. पाटस आणि इंदापूर मार्गावरील रस्ता बंद करण्यात आला आहे. तसंच, वाहनंदेखील वाहून गेली आहेत. इतकंच नव्हे तर शेतीदेखील पूर्णपणे पाण्यात गेला आहे. काटेवस्ती येथे कॅनोल फुटला होता तेव्हापासून येथील रहिवाशी घराबाहेरच थांबलेले पाहायला मिळतात. 

घरातील सिलेंडर पाण्यासोबत वाहून गेलं आहे. पाण्याचा लोंढा अद्याप तसाच आहे. आम्ही तीन महिन्यांच्या बाळ्यासह शेजाऱ्यांच्या घरात राहिलो होतो, अशी माहिती काटेवाडीतील रहिवाशांनी दिली आहे. 

मुख्यमंत्र्यांकडून परिस्थितीचा आढावा

पुणे जिल्ह्यातील मुसळधार पावसाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला आहे. पुणे जिल्ह्यात बारामती, इंदापूर या भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुख्यमंत्र्यांकडून प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश तसेच सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवण्याचेही मुख्यमंत्र्यांचे आदेश देण्यात आले आहेत. 

चिपळूणमध्ये थरार

तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर चिपळूण मधील  पिंपळी सोनारवाडी येथील नदीपात्रात अडकलेल्या तिघांना सुखरूप बाहेर काढण्यात आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमला यश आलं आहे. नदीमध्ये चढणीचे मासे पकडण्यासाठी तिघेजण गेले असता नदीपात्रात अडकले होते. नवर बायको आणि त्यांच्या सतरा वर्षाच्या पुतण्याला आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमने दिले जीवदान. संतोष पवार त्याची पत्नी सुरेखा पवार आणि पुतण्या ओंकार पवार अशी बचावलेल्या तिघांची नावे आहेत. तिघेही चिपळूण मधील दळवटणे येथील रहिवाशी असल्याची माहिती.

Read More