Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

धक्कादायक वास्तव : तुम्हीही रस्त्यावर सरबत किंवा बर्फाचा गोळा खाताय ?

रस्त्यावर मिळणारी सरबतं ही विष असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

धक्कादायक वास्तव :  तुम्हीही रस्त्यावर सरबत किंवा बर्फाचा गोळा खाताय ?

कपिल राऊत झी मीडिया, ठाणे : रस्त्यावर मिळणारी सरबतं ही विष असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. सध्या उन्हाळा सुरु असल्यानं रस्त्यांवर सरबतांच्या गाड्यांवर चांगलीच गर्दी आढळते. उन्हाळा सुरु झालाय. पारा थेट ४० अंश सेल्सिअसवर पोहचलाय. कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्यांना या उन्हाच्या काहिलीचा चांगलाच त्रास होतोय. अशा वेळी रस्त्यावर एखाद्या सरबत किंवा बर्फाच्या गोळ्याच्या गाडीकडे सगळ्यांचेच पाय वळतात. पण झी २४ तासच्या स्पेशल रिपोर्टमध्ये सरबंत आणि बर्फाचे गोळे, यांच्या शुद्धतेबाबत विक्रेत्यांकडून याबाबत धक्कादायक उत्तरे मिळाली. लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या सरबत विक्रेत्यांवर अन्न आणि औषध प्रशासन विभागानं कारवाई करणं गरेजचं आहे. तसंच उन्हाळ्यात शक्यतो घरातूनच गरम पाणी सोबत घेऊन घराबाहेर पडणं उत्तम असं आवाहन यानिमित्तानं करण्यात येतयं.

आजारांना आमंत्रण 

 सरबतासाठी वापरल्या जाणाऱ्या अशुद्ध पाणी आणि बर्फामुळे, विविध आजारांना आयतं आमंत्रण मिळत असल्याचे वैदकीय तज्ञ बाळासाहेब गांधी यांनी सांगितले. 

Read More